घरमुंबईएसटी तोट्यात तरी शिवशाहीसाठी शाहीथाट

एसटी तोट्यात तरी शिवशाहीसाठी शाहीथाट

Subscribe

स्वतंत्र आगाराची होणार निर्मिती

राज्य परिवहन महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसगाड्यांच्या वारंवार होणार्‍या अपघातामुळे महामंडळ कायम वादात सापडत ्रआहे. असे असतानाही महामंडळाकडून या बसगाड्यांकडे झुकते माप दिले जात आहे. वाढता तोटा म्हणून एका बाजूला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक 30 टक्क्यांपेक्षा कमी भारमान असलेल्या साध्या बसगाड्यांच्या(लालपरी) ग्रामीण भागातील फेर्‍या बंद करण्याच्या सूचना देत असताना दुसरीकडे मात्र महामंडळात आर्थिक खाईत लोटणार्‍या शिवशाहीच्या नवीन 200 बसमार्गांचे नियोजन करण्याचे प्रस्ताव सादर करा, शिवशाहीसाठी कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, परळ याठिकाणी स्वतंत्र आगार निर्माण करा, अशाही सूचना करत आहेत. अशा प्रकारे महामंडळ एका बाजुला ग्रामीण भागांना जोडणार्‍या साध्या एसटी बसगाड्यांवर घाव घालत आहे, तर दुसरीकडे शिवशाहीसाठी पायघड्या घालत आहे, यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना सूखकर, वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक अशी शिवशाहीची बस आणली. मात्र या अत्याधुनिक शिवशाही बसकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेली वातानुकूलित शिवशाही बससेवा सध्या तोट्यात सुरू आहे. त्यामुळे आधीच आर्थिक चणचण सहन करणार्‍या एसटीला मोठा फटका बसत आहे. तरी देखील ‘शिवशाही‘च्या बसेस सुरु ठेवण्याचा अट्टाहास कशाकरिता, कुणाच्या फायद्याकरिता, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता तर शिवशाहीसाठी स्वतंत्र आगार उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

तत्कालीन परिवहण मंत्री दिवाकर रावते यांनी 6 एप्रिल 2018 पासून खासगी शिवशाही बससेवा राज्यभर सुरु केल्या. मे. प्रसन्न पर्पल, मे. रेम्बो, एस.के. एस, मे. अ‍ॅरॉन टूर्स, मे. अहरम टूर्स, भगिरथी आणि मे. बाफना ब्रदर्स, या खासगी बस कंपन्यांनी राज्यात सुमारे 1 हजारांपेक्षा जास्त बसगाड्या सुरु केल्या. या बसगाड्या सुरु झाल्याने लांब पल्ल्यांच्या मार्गावर प्राधान्याने शिवशाही धावू लागली. त्यानंतर मात्र सर्वसामान्यांसाठी असलेले साधी एसटी बसगाडी दिसेनाशी झाली. शिवशाहीला तिकीट दर ज्यादा असल्याने आजही प्रवासी साध्या बसगाड्यांनी प्रवास करत आहेत.

‘शिवशाही’ बसगाड्या चालवणार्‍या खासगी कंपन्यांनी करार करताना सोयीचा करुन घेतला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे शिवशाहीची फेरी रद्द झाल्यास 300ते 350 कि.मी. चे 19 ते 41 पैशाप्रमाणे शिवशाहीच्या कंपनीला महामंडळाला पैसा मोजावे लागत आहे. 350 ते 399 कि.मी.ला 18 रु. 12 पैसे, 400 ते 449 कि.मी. ला 17 रु. 10 पैसे, अशा पध्दतीने जेवढी बस फिरेल तेवढा कि.मी चा दर कमी करण्याचा करार झाला होता. शिवशाहीने प्रशासनात पाय रोवल्यानंतर हळूहळू दबाव वाढवण्यास सुरुवात केली. शिवशाहीच्या चुकीमुळे बसने ठरवून दिलेले कि.मी. पूर्ण न केल्यास किंवा फेरी रद्द झाल्यास करारामध्ये 5 हजार रुपये दंडाची केलेली तरतूद रद्द करण्यात यशस्वी झाले.

- Advertisement -

राज्यात शिवशाहीच्या 1 हजार बसेस
राज्यात ‘एसटी‘च्या १८ हजार बसेस सध्या विविध मार्गांवर धावत आहेत. त्यापैकी 1 हजार या शिवशाहीच्या बसेस असून त्या विविध मार्गांवर धावत आहेत. मात्र, त्यातील निम्म्या बसेस या खातसगी कंत्राटदारांच्या मालकीच्या आहेत. त्यातील अर्ध्या बसगाड्या अर्ध्या भरलेल्या स्थितीत धावतात. ४२ आसनी बसमधून सरासरी १५ प्रवासीच प्रवास करत असतात. त्यामुळे शिवशाही ही संपूर्णपणे तोट्यात गेली आहे.

फायदे-तोट्याचे
साध्या बसगाडीचे दर – 135 रु.
शिवशाही – 200 रु.
साध्या बसचे सध्याचे प्रवासी भारमान- 40 टक्के
शिवशाही बसचे सध्याचे प्रवासी भारमान- 25 ते 28 टक्के

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -