घरताज्या घडामोडीधक्कादायक: डोंबिवलीत खाडीच्या पाण्यात आढळली दोन चिमुरडी मुले

धक्कादायक: डोंबिवलीत खाडीच्या पाण्यात आढळली दोन चिमुरडी मुले

Subscribe

डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीत एका खाडीच्या पाण्यात दोन चिमुरडी मुले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  ही दोन मुले पाण्याच्या अगदी मधोमध असलेल्या टापूवर आढळून आली आहेत. डोंबिवलीमधील हा प्रकार मन हेलावून टाकणारा आहे. तिथल्या लोकांनी या दोन्ही मुलांना पोलिसांकडे दिले आहे.

पाण्यात दोन मुली दिसताच आजूबाजूच्या परिसरातील काही लोक ताबडतोब पाण्यात उतरले. त्यांनी दोन्ही मुलांना सुखरूपपणे बाहेर काढले. पाण्यात सापडलेल्या मुलांमध्ये दिड वर्षांचा एक मुलगा आणि तीन महिन्याच्या एका मुलाचा समावेश आहे. या दोन्ही मुलांना डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. पोलिस मुलांच्या आईचा शोध घेत आहेत. दोन्ही गोंडस मुलांचे फोटो समोर येत आहेत. पोटच्या मुलांना पाण्यात सोडण्याची वेळ या आईवर का आली याचा पोलीस तपास करित आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊनची सर्वाच जास्त झळ सर्वसामान्य लोकांना बसली. आर्थिक कारणांमुळे मुलांच्या आईने आपल्या दोन्ही मुलांना खाडीच्या पाण्यात सोडून दिले असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई दोन्ही मुलांना घेऊन खाडीजवळ आली. मुलांना तिथेच टाकून ती निघून गेली. रत्नमाला साहू असे या महिलेचे नाव आहे. खाडीजवळ या महिलेचा मोबाईलही सापडल्याची माहिती तिथल्या ग्रामस्थांनी दिले आहे, असे पोलिसांनी सांगितले. तरी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. लवकरात लवकर दोन्ही चिमुरड्यांना त्यांच्या आईपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.


हेही वाचा – भारत बंद असताना मुंबईत ‘बेस्ट’ ची वाहतूक सुरळीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -