घरCORONA UPDATECorona Update: आज राज्यात ६ हजार ३६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले

Corona Update: आज राज्यात ६ हजार ३६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले

Subscribe

राज्यात कोरोना रूग्ण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनाचे ६ हजार ३६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.४२ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आज ४ हजार ४६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोना रूग्णांच्या मृतांची संख्या कमी झाली आहे. आज राज्यात केवळ ५३ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.५६ टक्के इतका आहे.

- Advertisement -

राज्यात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ५९ हजार ३६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार९६१ व्यक्ती या होमक्वारंटाईन आहेत. तर ५ हजार ६१८ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -