घरदेश-विदेशRajnath Singh: पाकिस्तानला शक्य नसेल, तर दहशतवाद रोखण्यासाठी भारताची मदत घ्या; राजनाथ...

Rajnath Singh: पाकिस्तानला शक्य नसेल, तर दहशतवाद रोखण्यासाठी भारताची मदत घ्या; राजनाथ सिंह

Subscribe

पाकिस्तानला जर दहशतवादावर नियंत्रण मिळवता येत नसेल तर त्यांनी भारताची मदत घ्यावी. भारत सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे, मात्र दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: पाकिस्तानने आपल्या भूमीतून दहशतवाद संपवून त्याविरोधात निर्णायक कारवाई करावी, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. आपण दहशतवाद संपवू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर भारताची मदत घ्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितले. पाकिस्तानने दहशतवादाचा वापर करून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. आम्ही सीमेपलीकडील दहशतवाद सहन करणार नाही आणि इस्लामाबादशी संबंध सुधारण्यासाठी दहशतवाद बाजूला ठेवू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका राजनाथ सिंह यांनी मांडली आहे. (International News Pakistan can t Stop then India will help to stop terrorism Rajnath Singh)

‘भारत -पाकिस्तान मिळून दहशतवाद संपवू शकतात, पण…’

अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी इस्लामाबादवर असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील दहशतीचे, शत्रुत्वाचे किंवा हिंसाचाराचे वातावरण संपवले पाहिजे. पाकिस्तान आपला शेजारी आहे. एकत्रितपणे आपण दहशतवाद संपवू शकतो, पण हा त्यांचा निर्णय आहे. मी फक्त एक सूचना करत आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत काम करू देणार नाही.

- Advertisement -

दहशतवादामुळे दोन्ही देशांमधील संबंध प्रदीर्घ काळापासून तणावाचे राहिले आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांच्या कठोर वक्तव्यांमुळे संबंध ताणले गेले आहेत. हा अंतर्गत मुद्दा असल्याचे भारताने प्रत्येक मंचावर स्पष्ट केले आहे.

संरक्षणमंत्र्यांचा दावा – भाजपा भेदभावाच्या पलीकडे

तीन तलाक कायदा रद्द केल्याचं सांगत राजनाथ सिंह म्हणाले की, भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव करत नाही आणि त्यासाठी महिलांचा सन्मान सर्वोपरी आहे. ते म्हणाले, लोक म्हणतात की, भाजपा नेहमीच हिंदू-मुस्लिमांबद्दल बोलतो. मी म्हणतो की आम्ही हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यात भेदभाव करत नाही. भाजपा सर्वांना बरोबर घेऊन जातो.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024: भ्रष्टाचारविरोधातील लढाई थांबणार नाही; EDचे फक्त 3 टक्के खटले राजकारण्यांवर- मोदी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -