घरमुंबईचेंबूरमध्ये पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळला; २ जण जखमी

चेंबूरमध्ये पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळला; २ जण जखमी

Subscribe

दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमध्ये एक पेट्रोल पंपावरील कर्माचरी तर दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मुंबईच्या चेंबूरमध्ये बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चेंबूरमध्येच पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. चेंबूर पूर्वेला असणाऱ्या छगन मीठा पेट्रोल पंपावर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छगन मीठा पेट्रोल पंपावर अचानक स्लॅब कोसळल्यामुळे सर्वांची पळापळ झाली. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमध्ये एक पेट्रोल पंपावरील कर्माचरी तर दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे. लालचंद ढोलपुरिया आणि जतीन मंडलिक असी जखमींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. जखमींवर सध्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

चेंबूरमध्ये बिल्डरची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -