घरठाणे...तर दारू खरेदीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांची टेस्ट का नाही? कल्याण पूर्वेतील नागरीकांचा प्रशासनाला...

…तर दारू खरेदीसाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांची टेस्ट का नाही? कल्याण पूर्वेतील नागरीकांचा प्रशासनाला प्रश्न

Subscribe

संचार बंदीचेही उल्लंघन होत असतानाही या तळीरामांची पालिका प्रशासनाकडून अँटीजन टेस्ट होऊन अन्य नागरिकांप्रमाणे यांचे वरही कामदेशीर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न पालिका प्रशासनाला नागरिकाकडून  विचारला जात आहे

कल्याण-गेल्या १४ एप्रिल च्या रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. याच बरोबर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या कमी होत असली तरीही पालिकेला कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी नवनवीन कृती आराखला राबवत आहेत.याचाच एक भाग म्हणून शहरात विनाकारण रस्त्यांवर  फिरणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याच बरोबर त्यांची कोरोना अँटीजन टेस्ट ही करण्यात येत आहे, परंतु शहरातील विविध ठिकाणच्या वाईन शॉप समोरील रस्त्यावर दारू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडून रस्त्यावर उतरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट का केली जात नाही ? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांकडून पालिका प्रशासनाला विचारला जात आहे.कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावरील एक बार आणि एक वाईन शॉपच्या दुकानासमोरील रस्त्यावर  बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सायंकाळी ६ नंतर दारू खरेदी करणारे नाका परिसरातील कोपऱ्या कोपऱ्यात घुटमळत असतानाचे चित्र दिसत आहे.
या ग्राहकांना ते जिथे उभे आहेत त्याच जागेवर बार आणि वाईन शॉप विक्रेत्यांकडून दारु पोहचवली जात आहे. याचाच अर्थ फक्त दारु खरेदी साठी आपल्या घरातून दुकानाच्या समोरील रस्त्यावर येणाऱ्या नागरीकांकडून कोरोना साथ रोग प्रतिबंधात्मक नियमांचे त्याच बरोबर राज्यात लागू असलेल्या संचार बंदीचेही उल्लंघन होत असतांनाही या तळीरामांची पालिका प्रशासनाकडून अँटीजन टेस्ट होऊन अन्य नागरीकांप्रमाणे यांचे वरही कामदेशीर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न पालिका प्रशासनाला या परिसरातील इतर व्यापारी आणि नागरीकां कडून विचारला जावू लागला आहे. कदाचित राज्य शासनाच्या महसूलात लाखो मोलाची भर टाकण्याचे काम या तळीरामांकडून होत असल्याने कदाचित वरीष्ठ पातळीवरूनच अशा प्रकारच्या दारू विक्री आणि खरेदी कडे कानाडोळा करण्यात यावा, अशा प्रकारच्या सुचना स्थानिक पातळी वरील संबंधी अधिकारी वर्गाला खाजगीत दिल्या गेल्या असाव्यात अशीही नागरीकांत चर्चा आहे.
 रस्त्यावर दारू साठी फिरणारे हे तळीराम कोणत्या ‘आवश्यक ‘ कारणांसाठी रस्त्यावर फिरत आहेत असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. दरम्यान या तळीरामांवर कसल्याही प्रकारची कारवाई न करता मंगळवारी तिसगांव नाक्यावर लावण्यात आलेल्या नाका बंदी मध्ये प्रभाग ४ जे मधील २ ८ तर प्रभाग ५ ड मधील ३० विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची एँटीजेन टेस्ट करण्यात आली.कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्या परंतु जिवनावश्यक संज्ञेत न मोडणाऱ्या २ हार्डवेअर, १ झेरॉक्स चे दुकान, १ सलून, २ मोबाईल विक्रीची दुकाने असे एकूण ६ दुकाने प्रभाग ५ ड चे प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकळ तसेच प्रभाग ४ जे क्षेत्र अधिकारी श्री वसंत भोंगाडे यांनी तिसगांव नाका परिसरातील गेल्या पंधरवड्यात  प्रत्येकी ३ दुकाने प्रतिबंधात्मक स्वरूपाची कारवाई म्हणून सिल केली होती.

 पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या एका आदेशानुसार जीवनावश्यक वस्तु विक्री दुकानांव्यतिरिक्त इतर अस्थापना मध्ये मोडणारी जी दुकाने उघडी दिसतील ती दुकाने लॉकडाउन कालावधी पूर्ण होईपर्यत सील करण्यात यावीत असे निर्देशीत करण्यात आले होते. परंतु वरील सर्व दुकान मालकांकडून दंड वसूल करून दुकानांचे सील उघडून देण्यात आले असल्याचे प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्यामुळे हा प्रकार म्हणजे पालिका आयुक्तांच्या निर्देशांची सरळ सरळ पायमल्लीच होत असल्याचे या परिसरातील नागरीकांत बोलले जात आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -