Cyclone Tauktae: केंद्र सरकार राज्यालाही मदत करणार, राज्य सरकारचा मदतीवर नेहमीच कांगावा – फडणवीस

राज्यात काही झाले तरी सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे आता हे नेहमीचे झाले

Cyclone Tauktae: devendra Fadnavis slams state government Central government will also help the state
Cyclone Tauktae: केंद्र सरकार राज्यालाही मदत करणार, राज्य सरकारचा मदतीवर नेहमीच कांगावा - फडणवीस

तौत्के चक्रीदावळाच्या तडाख्यामध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. अजूनही जवळ जवळ ६०० गावांमध्ये अंधारात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने मागील निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जाहीर केलेली मदत अजूनही काही नागरिकांना मिळाली नसल्याचे समजते आहे. आताच्या संकटात तरी राज्य सरकारची मदत मिळाली अशी आपेक्षा असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. राज्य सरकार आत्मविश्वासी नसून आत्मघातकी आहे असा घाणाघात फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.

विरोधी पक्षनेते रत्नागिरी, खेडमध्ये नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेत आहेत. कोकणात सलग दुसऱ्या वर्षात चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. या भागातील नागिरकांचे निसर्ग चक्रीवादळामुळे देखील मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अजूनही प्राप्त झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. राज्यात काही झाले तरी सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे आता हे नेहमीचे झाले असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणात ६० ते ७० हजार कुटुंबं अंधारात आहेत तर सुमारे ६०० गावांधमध्ये वीज नाही आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतीचे, फळबाग आणि झाडांचे नुकसान झाले आहे. मच्छिमारांच्या काही बौटी समुद्रात वाहून गेल्या आहेत. मच्छिमांरावर संकट कोसळले आहे. लोकांना घरांवर छप्पर टाकण्यासाठी पत्रे हवे होते ते मिळाले नाहीत तर फक्त एका झाडामागे १०० रुपये मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे फडणीसांनी म्हटले आहे.

केंद्र सरकार सर्व राज्यांना मदत देणार

गुजरातमध्ये चक्रीवादळाचा फटका जास्त बसला आहे. यामध्ये काही नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. झाडे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा दौरा केला आहे. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे मोदींनी मदतीची घोषणा केली आहे त्याप्रमाणे इतर राज्यांसाठीही मदत करणार असल्याचे सांगितले आहे. सत्यता न पडताळता राज्य सरकारला केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम करुन जबाबदारी झटकता येते अशी टीका फडणवीसांनी केली आहे. राज्यातील ठाकरे सरकार हे मदत न करता कांगावा करण्याचे काम करत आहे. हे सरकार फक्त आरडाओरडा करण्यात मग्न असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला केवळ फसवत रहायच

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. राज्य सरकार आता केंद्र सरकारवर जबाबदारी झटकत आहे. आता केंद्र सरकारकडे विनंती करत आहेत. परंतु यासाठी कायदेशीर प्रक्रिया प्रस्ताव तयार करा, हे करण्यासाठी मागासलेपणा संदर्भात नवीन पुरावे तयार करावे लागणार आहेत. आम्ही काही करणार नाही परंतु आम्ही मोदींना सांगू आणि मराठा समाजाला फसवत रहायचे असा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशी स्पष्ट भाजपची भूमिका असल्याचेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.