घरमुंबईपीएसीएल घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याची ईडीकडे तक्रार

पीएसीएल घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याची ईडीकडे तक्रार

Subscribe

देशभरातील सर्वात मोठ्या ४९ हजार १०० कोटी रुपयांच्या पीएसीएल घोटाळ्यातील काही मालमत्ता माहिम-पालघरमध्ये असल्याचे विरारमधील एका कार्यकर्त्याने उघडकिस आणले असून,ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी त्याने शासनाकडे केली आहे.
५ कोटी ८५ लाख गुंतवणूकदारांकडून तब्बल ४९ हजार १०० कोटी गोळा करून दिल्लीतील पीएसीएल कंपनीने देशभरातील सर्वात मोठा घोटाळा केला होता. या घोटाळ्यातून जमा केलेल्या रकमेतून पीएसीएलने देशभरात विविध कंपन्या स्थापन करून जमीनी खरेदी केल्या होत्या.हा घोटाळा उघडकिस आल्यानंतर या जमीनी ताब्यात घेवून तीच्या लिलावातून आलेली रक्कम गुतवणूकदारांना देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांनी पैसे भरल्याच्या पावत्या लावून अर्ज दाखल केले होते.त्यांचे पैसे परत मिळण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.

मात्र,पीएसीएलने काही ठिकाणी जमीनी खरेदी करून त्याचा सातबारा स्वतःचे नावे न करता जुन्याच मालकाच्या नावे ठेवला.त्यामुळे या जमीनी पीएसीएलच्या भागीदार असलेल्या कंपन्यांकडे सुरक्षीत राहिल्या. सातबारा उतार्‍यावर मुळ मालकाचेच नाव असल्यामुळे अशा मालमत्ता शासनाला दिसून आल्या नाही.अशीच एक मालमत्ता मौजे माहिम-पालघर येथे असल्याचे विरारमधील सामाजिक कार्यकर्ता झहीर शेख याने उघडकिस आणली आहे.

- Advertisement -

पीएसीएल फंडातून पैसे गोळा केल्यानंतर मुख्य आरोपी निर्मलसिंग भंगु याने १३ विविध कंपन्या काढून त्यांच्या माध्यमातून मालमत्ता खरेदी केल्या होत्या.या १३ कंपन्यांपैकी एक असलेल्या एनएसबी इन्फ्रास्ट्रक्चर ऍण्ड प्रोजेक्ट प्रा.लि.या कंपनीचे डायरेक्टर प्रतिककुमार याने मौजे माहिम येथील सर्वे क्र.७५५,७८०,७८१ मधील एकूण ५९ प्लॉट सन २००९ आणि २०१० मध्ये अभय गंगाधर पागधरे यांच्याकडून खरेदी केले होते.त्यावेळी या व्यवहाराची नोंदणी दुय्यम निबंधक पालघर यांच्याकडे करण्यात आली होती.मात्र,खरेदी केल्यानंतरही आजही या मालमत्तेचा सातबारा अभय गंगाधर पागधरे यांच्याच नावे ठेवण्यात आला आहे.त्यामुळे पीएसीएलची मालमत्ता शोधणार्‍या शासनाच्या नजरेतून ही मालमत्ता सुटली होती.ती शेख यांनी पुराव्यासह उजेडात आणली आहे.
या मालमत्तेच्या व्यवहाराचे दस्तऐवज,नविन सातबारे उतारे आणि इतर पुरावे जोडून शेख याने ईडी, या घोटाळची चौकशी करणारी न्या.लोढा समिती,न्या.आर.एस.वीर्क यांच्याकडे तशी माहिती पाठवली आहे.
मौजे माहिम येथील ही मालमत्ता ताब्यात घेवून शासनाने तीची विक्री करून फसवणूक झालेल्या पीएसीएलच्या ग्राहकांना रक्कम परत करावी.त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल अशी मागणीही झहीर शेखने केली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -