घरमुंबईबदलापूरमध्ये वडीलांवर अंत्यसंस्कार करुन मुलांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले

बदलापूरमध्ये वडीलांवर अंत्यसंस्कार करुन मुलांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले

Subscribe

आज सर्वसामान्यांपासून, नेतेमंडळी, सेलिब्रेटी यांनी मतदान करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. पण या सर्वात लक्षात राहिले तर बदलापूरमधील म्हात्रे कुटुंबियांनी केलेले मतदान.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पाडले. राज्याच्या काही भागांत उत्साहात मतदान पार पडले तर काही भागात हाणामारीच्या किरकोळ घटना घडल्या. राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंदिस्त झाले आहे. आज सर्वसामान्यांपासून, नेतेमंडळी, सेलिब्रेटी यांनी मतदान करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. पण या सर्वात लक्षात राहिले तर बदलापूरमधील म्हात्रे कुटुंबियांनी केलेले मतदान. दुःखाचा डोंगर कोसळला असताना म्हात्रे कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पडले आहे. अशाप्रकारे बदलापूरमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलांनी मतदान करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

बदलापूरमधील वडवली या गावी म्हात्रे कुटुंबीय राहतात. पांगळू झिपरु म्हात्रे यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना ७ मुलं आहेत. या ७ मुलांनी त्यांना अग्नी दिला. त्यानंतर आज सकाळी अस्थी गोळा करण्याचा विधी पार पडल्यानंतर पांगळू म्हात्रे यांच्या सातही मुलांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याप्रमाणेच म्हात्रे कुटुंबातील ५२ सदस्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. दुःखाचा डोंगर कोसळला असताना म्हात्रे कुटुंबीयांनी मतदान करत देशाचे नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडले. यावेळी त्यांनी इतरांनासुद्धा मतदान करण्याचे आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -