घरमुंबईनिवडणुकीत व्यस्त असल्याने शिक्षकांना दुसऱ्या दिवशी लेट येण्याची सूट

निवडणुकीत व्यस्त असल्याने शिक्षकांना दुसऱ्या दिवशी लेट येण्याची सूट

Subscribe

मतदानाच्या दिवशी कामावर लेट येण्याची सवलत मिळाल्याने निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या सर्व शिक्षकांना दिलासा

विधानसभा निवडणूकीच्या कामानिमित्त गेले दोन दिवसांपासून तसेच आज २१ ऑक्टोबर मतदानाच्या दिवशी शिक्षक वर्ग व्यस्त होता. तसेच मतदानाच्या दिवशी कामावर लेट येण्याची सवलत मिळाल्याने निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या सर्व शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील एक परिपत्रक जिल्हा अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले आहे. त्या परिपत्रकांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे.

शिक्षकांना मिळाला दिलासा

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिक्षक निवडणूक कामात अडकले होते. यावेळी बऱ्याच शिक्षकांची कामे ही मध्यरात्री उशिरापर्यंत तर काहींचे पहाटे पर्यंत सुरूच होते. यावेळी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना नियोजित वेळेत शाळेत पोहोचावे लागले होते. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने पाठपुरावा देखील केला होता. यासंदर्भातील खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घेतल्याने एक परिपत्रक सादर केले आहे.

- Advertisement -

यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील निवडणुकीचे काम करणाऱ्या शिक्षकांना मतदानाच्या कामानिमित्त उशीर होण्य़ाची शक्यता असल्याने त्यांना उद्या कामावर लेट जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

असे म्हटले आहे परिपत्रकात…

मुंबई जिल्ह्यात कार्यरत कर्मचारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील असल्याने त्य़ांनी निवडणुकीची कामे पुर्ण करण्यास मध्यरात्र किंवा पहाट देखील उजाडते. ज्या मतदार संघातून मुख्यालयात पोहोचण्यासाठी प्रवासाला जास्त वेळ लागणार असेल तर मतदार साहित्य जमा करण्याच्या तारखेनंतरचा दिवस सामान्य कर्तव्य कालावधी मानण्यात येणार आहे.

त्यामुळे कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकारी यांची २२ ऑक्टोबरला गैरहजेरी लावली जाणार नाही, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

 


एक्झिट पोल म्हणतायत, राज्यात महायुतीचं सरकार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -