घरमुंबईपूर्व उपनगरात पुनर्विकास प्रकल्पांना गती

पूर्व उपनगरात पुनर्विकास प्रकल्पांना गती

Subscribe

डीपी अहवालानंतर प्रकल्पांसाठी चालना

म्हाडाच्या इमारतीचा पुर्नविकास करताना तो विकासकाच्या मदतीने करायचा की सोसायटी म्हणून स्वतःच विकास करायचा याची चाचपणी सध्या मुंबईत पुर्नविकासाच्या प्रकल्पाच्या निमित्ताने सुरू झालेली आहे. गेल्या सात ते आठ महिन्यात म्हाडाकडे आतापर्यंत १०७ प्रकल्पांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी ५० प्रकल्पांना म्हाडामार्फत ऑफर लेटर देण्यात आले आहे. एकूणच पुर्नविकासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सकारात्मक आणि चांगले वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. म्हाडाने ७ प्रकल्पांना दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातून म्हाडाला कोट्यवधी रूपयांची प्रिमिअमची रक्कमही मिळाली आहे. बहुतांश पुर्नवसनाचे प्रकल्प हे पूर्व उपनगरातून आहेत.

म्हाडाच्या संपूर्ण मुंबईतील ११४ लेआऊटवर साधारणपणे ४५०० सोसायटी आहेत. या सगळ्या सोसायटी ४० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यामुळेच पुर्नविकासासाठी अनेक सोसायटीकडून सध्या पुढाकार घेण्यात आला आहे. विकासकाशिवाय स्वतः सोसायटी म्हणून इमारतीच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सध्या विचारणा होत आहे. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये अधिक फायदे असल्यानेच यासाठी माहिती घेण्यासाठी लोकांचा कल आहे.

- Advertisement -

म्हाडाच्या धोरणामध्ये सुधारणा झाल्यानंतर पुर्नविकासासाठी सोसायटीकडून अधिक हालचालींना वेग आलेला आहे. हे वातावरण विकासासाठी चांगले असल्याचेही तो अधिकारी म्हणाला. मधल्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुक आणि विकास प्रकल्पांमध्ये संथगती दिसून आली होती. पण आता अनेक सोसायटी सदस्य पुर्नविकास प्रकल्पासाठी पुढाकार घेत आहेत. गेल्या सात ते आठ महिन्यात चांगल्या प्रमाणात अर्ज आले. त्यापैकी ५० प्रकल्पांना ऑफर लेटर देण्यात आले. तर १५ अर्ज हे छाननी प्रक्रियेत आहेत. आणखी दहा प्रकल्प सोसायटी स्थरावर निर्णय प्रक्रियेसाठी प्रलंबित असल्याचे त्या अधिकार्‍याने सांगितले.

मुंबईचा विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर भुखंडाच्या आरक्षणाशी संबंधित अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे विकासासाठी सोसायटी सदस्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. पाच ते सहा महिन्यात पुर्नविकासाचे धोरण आणखी स्पष्ट होईल असे त्या अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

एनओसी मिळालेले पुर्नविकास प्रकल्प
पूर्व उपगनर – २६ प्रकल्प
पश्चिम उपनगर – १३ प्रकल्प
मध्य मुंबई – १

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -