घरमुंबईसावधान! तबेल्यातील दूध आरोग्यास हानिकारक

सावधान! तबेल्यातील दूध आरोग्यास हानिकारक

Subscribe

मुंबईत विकले जाणारे तबेल्यातील दूध आरोग्यासाठी घातक आहे. परळमधील पशुवैद्यकीय हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी मुंबईतील अनेक तबेल्यांतील दूधाची तपासणी केली. या तपासणीत ताज्या दूधात माणसाच्या सेवनासाठी घातक असलेल्या शिसे (लेड) आणि पारा म्हणजेच मर्क्युरीचं प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित मानकांपेक्षा जास्त आढळलं.

दूधाचं सेवन हे शरीरासाठी चांगलं असतं. त्यातील पोषक घटकांमुळे आपल्याला जीवनसत्व मिळतात. पण, आता दूध पिणं हे धोकादायक आणि जीवावरही बेतू शकतं. याचं कारण म्हणजे मुंबई शहर आणि जवळील परिसरांत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईच्या तब्येल्यात असणाऱ्या म्हशींच्या दूधाला विषाचं रुप आल्याची माहिती समोर आली आहे. परळच्या पशुवैद्यकीय कॉलेजच्या फार्माकोलॉजी आणि विष विज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, ठाणे आणि भिवंडीच्या तबेल्यात जाऊन म्हशींचे दूध आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली. या तपासणीत शिसे, पारा अशा धातूंचं प्रमाण जास्त आढळलं आहे. ‘जर्नल ऑफ अॅनिमल हेल्थ अँड प्रोडक्शन’ मध्ये हा रिसर्च प्रसिद्ध करण्यात आला आहे.

बोरीवली आणि भिवंडीतील दूधात शिसे जास्त

मुंबईत विकले जाणारे तबेल्यातील दूध आरोग्यासाठी घातक आहे. परळमधील पशुवैद्यकीय हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी मुंबईतील अनेक तबेल्यांतील दूधाची तपासणी केली. या तपासणीत ताज्या दूधात माणसाच्या सेवनासाठी घातक असलेल्या शिसे (लेड) आणि पारा म्हणजेच मर्क्युरीचं प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित मानकांपेक्षा जास्त आढळलं. विशेषत: बोरीवली आणि भिवंडीच्या तबेल्यातील दूधामध्ये या धातूंचं प्रमाण सर्वात जास्त आढळलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या धातूंच्या अधिक सेवनामुळे भविष्यात मानवी शरीरातील अवयव निष्क्रिय होऊ शकतात. दूधामुळे कॅल्शिअम मिळते. ज्यातून हाडांना मजबूती मिळते. पण, याच दूधामुळे शरीरातील काही अवयव निष्क्रिय ही होऊ शकतात हे देखील या अहवालातून समोर आलं आहे. मुंबई पशुवैद्यकीय कॉलेजच्या फार्माकोलॉजी आणि विष विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी मुंबईतील १०० तबेल्यांतील दूधांची तपासणी केली. यात भिवंडी, गोरेगाव, ठाणे, बोरीवली आणि कल्याण परिसरातील तबेल्यांचा समावेश होता.

- Advertisement -

याला जबाबदार कोण?

अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मानकांनुसार, दूधात लेड आणि मर्क्युरीचं प्रमाण ०.०१ पीपीएम असलं पाहिजे. पण, बोरीवलीच्या तबेल्यातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये ०.०८ पीपीएम एवढं लेडचं प्रमाण आढळलं. तसंच, भिवंडीत ०.०३२ पीपीएम मर्क्युरीचं प्रमाण आढळलं आहे. सर्व्हे अधिकाऱ्यांनुसार, तबेल्याच्या जवळ वाढत असलेल्या इमारतींमुळे, फॅक्टरीज या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत. यातून निघणारे धातू हे प्राण्यांच्या खाण्यावर परिणाम करत आहेत. दूषित हवा आणि खाण्यामुळे प्राण्यांच्या शरीरावर होऊन परिणाम दूधाच्या रुपाने ते बाहेर पडत आहे. पशू वैद्यकीय महाविद्यालयातील फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. सुशांत सोले यांनी सांगितलं, ‘‘काही वर्षांपूर्वी या महाविद्यालयातील प्रकल्पाचा एक भाग म्हणून दुधावर संशोधन केलं गेलं. हा रिसर्च वैद्यकीय संशोधनासाठी करण्यात आला आहे.”

दुधात भेसळीचं प्रमाण वाढल्यानं ‘एफडीए’द्वारे वारंवार मुंबईतील विविध भागातील तबेले आणि गोठ्याची तपासणी केली जाते. यात संशयित आढळून येणाऱ्या दुधाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले जातात. या तपासणीत बऱ्याचदा दुधात फॅटचं प्रमाण कमी असल्याचं समोर आलेलं आहे. अशा दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पण तबेल्यातील दूध प्रदूषित असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल.
– शैलैश आढाव, ‘एफडीए’च्या अन्न विभागाचे सह-आयुक्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -