घरमुंबई७२ तासानंतरही महिलांसाठी लोकल प्रवेश नाहीच , राज्य सरकारकडून पुन्हा रेल्वेला पत्र

७२ तासानंतरही महिलांसाठी लोकल प्रवेश नाहीच , राज्य सरकारकडून पुन्हा रेल्वेला पत्र

Subscribe

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लोकल प्रवेश देण्यासाठी पुन्हा एकदा मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दोन्ही रेल्वेला पत्र पाठवणारे स्मरणपत्र पाठवले आहे. महिला प्रवाशांना उपनगरीय लोकलमध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी राज्य सरकारने हा पत्रव्यवहार केला आहे. गेल्याच आठवड्यात राज्य सरकारकडून एक पत्र याआधीच रेल्वेला पाठवण्यात आले आहे. रेल्वेला दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारने आपला निर्णय जाहीर केलेला असतानाही रेल्वेकडून मात्र औपचारिकतेच्या फेऱ्या वाढवण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आत ७२ तास उलटल्यानंतरही रेल्वेकडून याबाबतचा कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारच्या आपत्ती आणि व्यवस्थापन विभागाकडून गेल्या आठवड्यात शनिवारी राज्य सरकारला पत्र लिहिण्यात आले होते. पण या पत्रावर रेल्वेने असमर्थता दर्शवत इतक्या कमी कालावधीत लोकल सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर रेल्वेने आपले उत्तर देत एकत्र मिटिंग घेण्याचे सुचविले होते. राज्य सरकारने लोकल सुरू करण्यासाठीचा प्रोटोकॉल जाहीर करत मार्गदर्शके जाहीर करावेत असे स्पष्टीकरण रेल्वेकडून जाहीर करण्यात आले होते. रेल्वे आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव हा पहिल्याच आठवड्यातील पत्रामुळे दिसून आला होता. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याचे आश्वासन देत मोठी घोषणा करत महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण राज्य सरकारने मात्र रेल्वेला याबाबतची कल्पना न दिल्याने लोकल सुरू करता येणार नाही असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -