घरमुंबईस्टेम थेरपीने दहा महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार

स्टेम थेरपीने दहा महिन्याच्या बाळावर यशस्वी उपचार

Subscribe

जगण्याची अजिबातच आशा नसलेल्या एका दहा महिन्याच्या बाळावर स्टेम थेरेपीने उपचार करुन त्याला नव्याने जीवदान देण्यात आले आहे. रुद्रांशचा मुदतपूर्व जन्म झाला असल्याकारणाने तो नेहमीच आजारी असायचा. फक्त ६०० ग्रॅम वजनाचा रुद्रांश ब्राँको-पल्मनरी डिस्प्लासिया या गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रस्त होता.

जन्मापासून आजारी असणाऱ्या रुद्रांश जगेल की नाही याची शाश्वती नव्हती. त्याला सतत व्हेंटीलेटरवर ठेवण्यासही धोका होता. अशा वेळी रूद्रांशवर स्टेम सेल थेरपीने उपचार करण्याचे सूर्या हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी ठरवले. स्टेम सेल थेरपीचा नवजात बालकावर उपचार करणं हा प्रयोग पहिल्यांदाच सूर्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचं संचालक डॉ. नंदकिशोर काब्रा यांनी सांगितले.

- Advertisement -

ब्रॉन्को पल्मनरी डिस्प्लासियाने ग्रस्त असलेल्या रूद्रांशच्या वयानुसार अत्यंत गंभीर समस्या होती. गर्भावस्थेत झालेल्या गुंतागुंतीमुळे रूद्रांशची गर्भातच वाढ खुंटली होती. त्यामुळे, २६ व्या आठवड्यातच मातेची प्रसूती करण्यात आली. रुद्रांशला श्वसन समस्या, संसर्ग, अॅनिमिया आणि प्लेटलेट्स कमी असण्याच्या समस्या होत्या.

रुद्रांशला २४ जुलै २०१८ रोजी सूर्या हॉस्पिटल्समध्ये दाखल केलं गेलं. याविषयी निओनॅटोलॉजिस्ट डॉ. हरि बालासुब्रमण्यन यांनी सांगितले की, ” संसर्गाला आळा घातल्यावर तो ३३ दिवसांचा असताना त्याला व्हेंटिलेटर सपोर्टपासून दूर करण्यासाठी रुद्रांशला सिस्टमॅटिक स्टिरॉईड रेजिमेन सुरू करण्यात आले. या बाळाला हळूहळू व्हेंटिलेटरपासून दूर करून ९ सेंमी पाणी आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. ”

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, २०१४ मध्ये दक्षिण कोरियातील सेओलमध्ये अत्यंत प्रिमॅच्युर बाळावर स्टेम सेल थेरपीचा प्रयोग करण्यात आला होता. २४ ते २६ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाला या थेरपीचा उपयोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करण्यात आला होता.

सूर्या हॉस्पिटलचे संस्थापक, बालरोग तज्ज्ञ डॉ. भूपेंद्र एस अवस्थी यांनी सांगितले की, ”  पालकांशी चर्चा करून या बाळाच्या एका श्वास नलिकेतून फुफ्फुसांमध्ये स्टेम सेल्सची थेरपी देण्यात आली. या बाळानेही चांगला प्रतिसाद दिला. बाळाला काही संसर्ग किंवा दुष्परिणाम होत नाही याचा अंदाज घेतला गेला. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -