मोदींच्या संपत्तीत ५२ टक्क्यांनी वाढ; २.५ कोटीची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारणसीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचा तपशिल त्यांच्या प्रतिज्ञापत्रकातून दिला आहे.

Modi cabinet 2.0
पंतपधान नरेंद्र मोदी

पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक २०१९चा वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रकामध्ये आपली स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. त्यामध्ये पंतप्रधान यांच्या संपूर्ण मालमत्तेचा उल्लेख केला आहे. पंतप्रधाना यांची एकूण संपत्ती २.५ कोटी रूपयांची आहे. मोदींना राजकीय पदांमुळे मिळणारा सरकारी पगार आणि बँकांमधील असलेल्या ठेवीवरील व्याजातून त्यांना पैसा मिळतो. तसेच त्यांना या व्यतिरिक्त उत्पन्नाचे दुसरे कुठलेहे साधन नाही आहे. त्यांच्या नावावर एक घर आहे. मात्र, त्यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सत्तेत आल्यापासूनचा उत्पन्नाचा तपशील

प्रतिज्ञापत्रकामध्ये मोदी यांनी आपल्या पत्नीचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांच्या संपत्ती बद्दल कुठही तपशील दिलेला नाही आहे. मोदीयांच्या स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत खात आहे. त्या खात्यामध्ये ४ हजार १४३ रूपये इतकी रक्कम आहे. तसेच एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चरचे २० हजार रुपयांचे बॉन्ड खरेदी केले आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळीचे उत्पन्न वाढल्याचे लक्षात येते. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान म्हणजेच २०१३-१४ साली ९ लाख ६९ हजार ७११ रूपये एवढी होती. तर २०१४-१५ मध्ये ८ लाख ५८ हजार ७८० रुपये होती. २०१५-१६ मध्ये १९ लाख २३ हजार १६० रूपये आहेत. २०१६-१७ मध्ये १४ लाख ५९ हजार ७५० रूपये एवढी होती. तर २०१७-१८ मध्ये १९ लाख ९२ हजार ५२० रूपये होती, आणि २०१८-१९ हे उत्पन्न हे २० लाखच्या घरात आहे. दरम्यान, प्रतिज्ञापत्रात मोदींच्या जंगम मालमत्ताचे विवरण करण्यात आले आहे. मोदींकडे रोख रक्कम ३८ हजार ७५० रूपये आहेत. तसेच बँकमध्ये १ कोटी २७ लाख ८५ हजार ७१७ रूपये आहेत. दागिन्यामध्ये ४५ ग्रॅमच्या सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत, त्यांची किंमत १ लाख १३ हजार ८०० रुपये एवढी आहे.

पंतप्रधानांचे शिक्षण

उमेदवारी अर्ज भरताना मोदींच्या शिक्षणाचाही उल्लेख झाला आहे. मोदी यांनी १९६७ मध्ये गुजरातमधून ‘एसएससी’ पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी दिल्ली यूनिव्हकर्सिटीमधून ‘बीए’ पूर्ण केले आहे. तसेच गुजरात यूनिव्हर्सिटीमधून त्यांनी ‘एमए’ पूर्ण केले आहे.