घरमुंबईलोकलवरील दगडफेकीत मागील सहा वर्षात ११३ जण जखमी

लोकलवरील दगडफेकीत मागील सहा वर्षात ११३ जण जखमी

Subscribe

मागील सहा वर्षांत लोकलवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या भागांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी स्पेशल फोर्स आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान ट्रॅक पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

मागील सहा वर्षात लोकलवरील दगडफेकीच्या १२० घटनांमध्ये ११३ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती काढली आहे. १२० घटनांमधील फक्त १८ प्रकरणं निकाली काढण्यात रेल्वे पोलिसांना यश आल्याचंही माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे. ”लोकलवर होणाऱ्या वाढत्या दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून तोपर्यंत या भागात स्पेशल फोर्स आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान ट्रॅक पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात येतील,” अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. आश्रफ यांनी दिली.

कुर्ल्यामध्ये दगडफेकीच्या सर्वाधिक घटना

आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या या माहितीनुसार २०१३ मध्ये दगडफेकीच्या सर्वाधिक म्हणजे ३५ घटना घडल्या असल्याचे स्पष्ट होते. यामध्ये १९ घटना कुर्ल्यात घडल्या असून त्यापाठोपाठ कल्याणमध्ये लोकलवरील दगडफेकीच्या १७ घटनांचा समावेश आहे. यातील अनेक घटना चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचंही दिसून आलं. आरफीएफच्या म्हणण्यानुसार रेल्वे रूळ ओलांडण्याच्या मार्गाजवळ दगडफेकीच्या सर्वाधिक घटना घडत आहेत. दरम्यान कुर्ला-घाटकोपर-कांजुरमार्ग या दरम्यान प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर या ठिकाणी दगडफेकीच्या सर्वाधिक घटना घडल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा – नवे कपडे आणून न दिल्यामुळे जेल कैद्याचा पत्नीला तीन तलाक

दगडफेकीवर सीसीटीव्ही ठेवणार लक्ष

”लोकलवर होणाऱ्या वाढत्या दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मात्र तोपर्यंत या भागात स्पेशल फोर्स आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान ट्रॅक पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात येतील,” अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. आश्रफ यांनी दिली. विशेष म्हणजे २०१३ पासून दरवर्षी दगडफेकीच्या २७ घटनांची नोंद करण्यात आली आहे. गर्दुल्ले, कचरा वेचक, झोपडपट्टीतील लोक यांसह काही फेरीवाले आणि तृतीय पंथी आदिंचा दगडफेकीच्या घटनांमध्ये समावेश असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -