घरमुंबईनिवडणुकीमुळे विद्यार्थी उजळणीपासून वंचित

निवडणुकीमुळे विद्यार्थी उजळणीपासून वंचित

Subscribe

परीक्षेच्या निकालावर परिणामाची शक्यता

21 ऑक्टोबरला होणार्‍या निवडणुकीमुळे शाळांच्या परीक्षा लवकर घ्याव्या लागणार असल्या तरी सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम अद्याप शिकवून झाला नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होताच शाळांना परीक्षा घ्यावी लागणार असल्याने परीक्षेपूर्वीच्या उजळणीला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.

परीक्षेपूर्वी 15 दिवस वेळापत्रक शाळांना जाहीर करावे लागते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करण्यास वेळ मिळतो. परंतु निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करत अनेक शिक्षकांना निवडणुकीच्या ड्यूटीही लावल्या. 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या नोंदणी, त्याची हजेरी, त्यांची माहिती संगणकामध्ये अपलोड करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर पडली आहे. 21 ऑक्टोबरला निवडणुका होणार असल्याने 19 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक आयोगाकडून शाळांचा ताबा घेण्यात येणार असल्याने शाळांना 19 ऑक्टोबरपूर्वी परीक्षा संपवाव्या लागणार आहेत. त्यामुळे सहामाही परीक्षा लवकर घ्यावी लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच निवडणूक ड्युटीमुळे शिक्षकांना शाळांमध्ये फार कमी वेळ मिळणार आहे.

- Advertisement -

30त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे परीक्षेपूर्वीच्या उजळणीपासून शिक्षकांना मुकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची उजळणी होणार नसल्याने त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात यावी असा तगादा अनेक पालकांकडून शाळा व्यवस्थापनाकडे लावला आहे. उजळणी नसल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची शक्यताही काही शिक्षकांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -