घरमुंबईभिवंडीत अल्पवयीन मुलामुलीचे अपहरण

भिवंडीत अल्पवयीन मुलामुलीचे अपहरण

Subscribe

पालकांमध्ये भीती

भिवंडी शहर परिसरातून अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत आहेत. परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा व एक 16 वर्षीय मुलगी अशा दोन अल्पवयीन मुलामुलीचे अपहरण झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पहिल्या घटनेत कामतघर येथील भाग्यनगरमध्ये राहणारा दिवाकर तापस महातो (12 ) हा कृष्णा कान्हा चौधरी स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकतो. तो शुक्रवारी सकाळी शाळेत गेला होता. मात्र, तो दोन दिवस उलटूनही घरी परतला नाही. कुटुंबियांकडून त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, अशी भीती असल्याने वडील तापस दुलाल महातो यांनी शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

या अपहरणाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करीत आहे, तर दुसर्‍या घटनेत शिवमल्हार कंपाऊंड, राहनाळ येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी ही राहत्या घरातून बाहेर गेली होती. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिचा नातेवाईक, मित्र, मैत्रिणींकडे शोध घेण्यात आला. मात्र, ती सापडली नाही. तिलाही फूस लावून एखाद्या गोष्टीचे आमिष दाखवून अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -