घरमुंबईआर्थिक वादातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

आर्थिक वादातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Subscribe

आर्थिक वादातून जमीरउल्ला हाफिजउल्ला चौधरी या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. जमीरउल्ला याला पैशावरुन बेदम मारहाण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल सलाम ऊर्फ पप्पू हुकूमअली चौधरी आणि अब्दुल कलीम कय्युम चौधरी अशी या दोघांची नावे आहेत. पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही शुक्रवारी येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

हाफीजउल्ला चौधरी हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते सध्या साकीनाका परिसरात राहतात. त्यांची पत्नी गावी तर तीन मुले मुंबईत काम करतात. त्यापैकी आमीरउल्ला हा विक्रोळी तर जमीरउल्ला आणि नियाजउल्ला हे दोघेही साकीनाका येथील खैरानी रोडवरील पप्पू चौधरी याच्याकडे कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी जमीरउल्लाने पप्पू याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, मात्र काही कारणास्तव त्याला ते पैसे परत करता आले नाही. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरू होता.

- Advertisement -

बेदम मारहाण
24 सप्टेंबरला जमीरउल्ला हा त्याच्या घरी होता, यावेळी तिथे पप्पू आणि अब्दुल कलीम आले. या दोघांनी त्याला बेदम मारहाण करून त्यांच्या गाळ्यात आणले होते, तिथेच त्याने त्याला जिवे मारण्याची धमकी देत सकाळपर्यंत पैशांची व्यवस्था केली नाहीतर तर त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर ते दोघेही तेथून निघून गेले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा एक नातेवाईक तिथे आला होता. यावेळी गाळ्यातील दुसर्‍या मजल्यावर जमीरउल्लाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याला दिसून आले.

दोघांना अटक
ही माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हाफिजउल्ला चौधरी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती, या जबानीत त्यांनी घडलेला प्रकार सांगून पप्पू चौधरी आणि अब्दुल कलीम चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी मारहाण करणे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत या दोघांनाही बुधवारी पोलिसांनी अटक केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -