घरमुंबईएलफिन्स्टन दुर्घटना: वर्षभरानंतरही भीती कायम

एलफिन्स्टन दुर्घटना: वर्षभरानंतरही भीती कायम

Subscribe
एलफिन्स्टन  रेल्वे पूलावर झालेल्या चेंगराचेंगीत २२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही प्रत्यक्षदर्शी दुर्घटनेला विसरु शकले नाहीत. या दुर्घटनेत जे वाचले त्यांना अजूनही दुर्घटना आठवली तरी भिती वाटते. दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी सैन्य दलाची मदत घेत नवा पूल उभारला. आता एलफिन्स्टन रोडचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले. मात्र तरीही एलफिन्स्टन रोड नावाचा उल्लेख झाला की या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या होतात. २९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ही दुर्घटना घडली होती. परळ ते एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाला जोडलेला हा पूल अरूंद असल्याने लोकांची गर्दी या पूलावर होती. सततधार पाऊस आणि पूलावरील गर्दीमुळे पाय घसरुन चेंगराचेंगरी झाली. घाबरलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला असून  घटना घडली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या परिसरात रहिवाशांना सर्वप्रथम चेंगराचेंगरी होत असल्याची घटना अफवा वाटली होती. एका अफवेमुळे २२ जणांचा मृत्यू झाला अशी घटना मुंबईने पहिल्यांदाच बघितली.

कशी घडली दुर्घटना ?

२९ सप्टेंबर २०१७ रोजी एलफिन्स्टन रोड स्थानकावर नेहमी प्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. मुसळधार पाऊसामुळे परळ आणि एलफिन्स्टन रेल्वेस्थानकांना जोडणाऱ्या पुल भिजला होता. परळयेथून एलफिन्स्टन रोड ला येणारे प्रवासी या पूलावर होते. त्यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भिती पसरली त्यामुळे पूलावरून खाली उतरण्यासाठी लोकांनी गर्दी केली. दरम्यान, पूल कोसळत असल्याची अफवा पसरली त्यामुळे प्रवासी जीव मुठीत धरून सर्वांनी एकदम बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पायऱ्यांवर पाणी सांडले असल्यामुळे पाय घसरुन काही प्रवाशी पडले. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला होता.

वर्षभरानंतरही भीती कायम

एलफिन्स्टन पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अपर्ना सावंत यांनी माय महानगरशी विशेष बातचीत केली. अपघाताचा अनुभव सांगतेवेळी त्या म्हणाल्या, की “माझे नवरात्रीचे उपवास सुरु होते. मी आणि माझी मैत्रीण एलपिन्स्टन रोड स्थानकावर जात होतो. त्यावेळी सर्व प्रवासी एकाच दिशेने जाताना मला दिसले. पाय घसरुन मी खाली पडली गर्दीत श्वास न घेता आल्यामुळे मी बेशुद्ध झाली. यानंतर कोणी मला रुग्णालयात नेले या बद्दल मला कल्पना नाही. पुलदुर्घटनेनंतर मला मानसिक धक्का लागला मी त्या पूलावरुन त्यानंतर कधी प्रवास केला नाही”.
एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शी – अपर्ना सावंत
सकाळी अचानक आम्हाला अशी माहिती मिळाली की पूलावर चेंगरीचेरी होऊन मोठी दुर्घटना घडली. माहिती मिळताच आम्ही डॉक्टरांच्या टीम केल्या. यामध्ये फॉरेंसिक विभागाचे अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. जखमी लोकांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून आम्ही वेगळा विभाग केला. त्यामुळे जखमींवर उपचार करणे सोपे झाले. मृतदेहांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आले. एक वर्ष झाला तरीही तो दिवस आम्ही विसरु शकत नाही.”
– डॉ. जिग्नेश अश्विन गांधी, औषध आणि शस्त्रक्रिया विभाग

चित्रांच्या माध्यातून दिली श्रद्धांजली

एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना  एन. एम. काँलेज रोटरी क्लब तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.  ज्या लोकांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली म्हणून रोटरी क्लबने ब्रीजच्या भिंतीवर चित्रे काढली. कॉलेजच्या मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ही चित्रे फक्त चेंगराचेगरीत प्राण गमावलेल्यांसाठी श्रद्धांजली नसून  आपल्या सुरक्षिततेला प्रधान्य न देता आपल्या जीवाची पर्वा न करता घाईगडबडीत धावत असतात अशा लोकांसाठी आहेत. समस्त देशवासीयांना आमची कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. सुरक्षिततेचे नियम पाळणेही तेवढेच गरजेचे आहे कारण आपल्या जीवापेक्षा मोलाचे काहीच नाही. आपले प्राण बहूमूल्य आहेत, अशी प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -