घरमुंबईमुंबईकरांचे आज मेगा हाल; तिन्ही मार्गावर ब्लॉक

मुंबईकरांचे आज मेगा हाल; तिन्ही मार्गावर ब्लॉक

Subscribe

आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मात्र, चांगलेच हाल होणार आहेत.

विविध तांत्रिक कामांसाठी रेल्वेकडून दर आठवड्याला मेगाब्लॉक घेण्यात येतो. आजही तिन्ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरच्या पनवेल ते वाशी मेगाब्लॉक घेण्यात आला असून पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे आज मेगाहाल होणार आहेत.

मध्य रेल्वे

- Advertisement -
  • मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग
  • सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

कल्याणपासून सुटणाऱ्या जलद उपनगरी रेल्वे दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर धावणार आहेत. तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि अर्ध जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबणार आहेत. त्याचप्रमाणे ब्लॉकमुळे रेल्वे वीस मिनिटे उशिराने धावतील. तर रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवा स्थानकातपर्यंतच धावेल आणि ही गाडी दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता विशेष उपनगरी रेल्वेही सोडली जाणार आहे.

पश्चिम रेल्वे

- Advertisement -
  • चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही धिम्या मार्गावर
  • सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहतील. तर रविवार वेळापत्रकामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील.

हार्बर मार्ग

  • पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर
  • सकाळी ११.३० ते दु. ४.०० वाजेपर्यंत

सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यान अप व डाऊन मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द राहतील. तसेच ठाणे ते पनवेल, बेलापूर ट्रान्स हार्बर आणि नेरुळ ते खारकोपर दरम्यान दोन्ही मार्गावरील आणि पनवेल ते अंधेरी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. तर ठाणे ते वाशी, नेरुळ आणि बेलापूर ते खारकोपर फेऱ्या पूर्ववत असणार आहेत.


हेही वाचा – मतदानाच्या दिवशी धुवाधार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -