घरमुंबईठाण्यातून बेकायदेशीर रक्कम जप्त; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांवर गुन्हा दाखल

ठाण्यातून बेकायदेशीर रक्कम जप्त; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांवर गुन्हा दाखल

Subscribe

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भ्रष्टाचारप्रकरणी बंदिस्त राष्ट्रवादी आमदार रमेश कदम याला रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर संध्याकाळी रमेश कदम हे घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसीडेंसी इमारतीत पोलीस ताफ्यासह पोहचले. त्याचवेळी ठाणे पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत इमारतीच्या पार्किंगमध्ये रमेश कदम आणि राजू खरे उपस्थित होते. त्यांच्याकडून ५३ लाख ४६ हजाराची रोकड सापडली. ठाणे पोलिसांनी रमेश कदम आणि राजू खरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर कदम याना घेऊन आलेल्या एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

शुक्रवारी अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणात बंदिस्त आमदार रमेश कदम यांना शुक्रवारी एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल उपचारासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात घेऊन गेले होते. परतीच्या प्रवासात संध्याकाळी रमेश कदम आणि पोलीस कर्मचारी हे खाजगी कंपनीच्या कारमधून येत होते. दरम्यान कदम यांनी औषधे घेण्याच्या बहाण्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घोडबंदर रोडवरील इमारतीत राजू खरे याला पार्किंग स्लॉट्मधे भेटले. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकली आणि ५३ लाख ४६ हजाराची रक्कम सापडली. याच घटनेच्या दरम्यान पोलिसांचा ताफाही उपस्थित होता. या प्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारागृहातून बाहेर पडणाऱ्या आरोपींना नेणाऱ्या पोलीस व्हॅनवर सीसीटीव्ही केमेरा आणि गाडीला जीपीएस लावण्याची लगबग सुरु झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे. या उपाययोजनेमुळे पोलीस व्हॅन आणि आरोपी कुठे आहेत याची माहिती मिळण्यास मदत होईल आणि अशा प्रकारच्या घटनाना आळा बसेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -