घरमुंबईकान्हेरी गुंफा परिसरात स्विमिंग पूल

कान्हेरी गुंफा परिसरात स्विमिंग पूल

Subscribe

आरक्षणात फेरबद्दल करण्याचा महापालिकेचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

बोरिवली पूर्व येथील कान्हेरी गुंफा परिसरात असलेल्या खेळाचे मैदानात आता जलतरण तलाव (स्विमिंग पूल) बांधण्याचा महापालिकेचा विचार आहे. अस्तित्वातील क्रिडांगणासोबत जलतरण तलावाचा अतिरिक्त वापर करण्यासाठी आरक्षणात फेरबदल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे.

बोरिवलीतील आर-मध्य विभागातील कान्हेरी गुंफा परिसरातील नगर भू. क्रमांक ५५९-सी-०३ धारण करणार्‍या भूखंडावर खेळाचे मैदान असे नवीन विकास आराखड्यात आरक्षण आहे. या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ हे ४९५५ चौरस मीटर एवढे आहे. या भूखंडालगतचा भाग हा झोपडपट्टीने व्याप्त असून, त्याठिकाणी महापालिकेचे एकही उद्यान किंवा खेळाचे मैदान नाही. त्यामुळे या भूखंडावर जलतरण तलाव बांधल्यास तो विभागातील एकमेव जलतरण तलाव असेल. तसेच विभागातील सर्व गोरगरीब जनतेला त्याचा उपयोग करता येईल, अशा प्रकारची मागणी स्थानिक नगरसेविकेने केली होती. त्यानुसार या मागणीचा विचार महापालिका करत आहे.

- Advertisement -

सध्या या भूखंडाचा विकास करून त्यावर महापालिकेने खेळाचे मैदान विकसित केलेले आहे. त्यावरील काही भागात मुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसवण्यात आले आहे. तो भाग मुलांना खेळण्यासाठी रहिवाशांसाठी खुला करण्यात आला आलेला आहे. मात्र, उर्वरित भाग अतिक्रमण मुक्त असला तरी नव्या विकास आराखड्यातील तरतुदीनुसार खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या भूखंडावर जलतरण तलावांचे बांधकाम सद्यस्थितीत करता येत नाही. त्यामुळे या भागातील जनतेला जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास आराखड्यात फेरबदल करण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पत्रव्यवहार करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यमान आरक्षणात फेरबदल करून अस्तित्वातील क्रिडांगण हे आरक्षण बदलून त्याऐवजी क्रिडांगणासोबतच जलतरण तलावाचा अतिरिक्त वापर असे आरक्षण टाकण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यासाठी महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने सुधार समितीची मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. सुधार समितीच्या मान्यतेनंतर महापालिकेच्यावतीने नगरविकास खात्याकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -