घरमहाराष्ट्रसुनील तटकरेंच्या धमकी पत्राबाबत रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

सुनील तटकरेंच्या धमकी पत्राबाबत रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना जीवे ठार मारण्याचे धमकी पत्र म्हसळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शुक्रवार 22 मार्च रोजी आले होते. ही वार्ता म्हसळ्यासह संपूर्ण मतदारसंघात पसरताच खळबळ माजून तटकरे समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून याचा निषेध केला जात आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष नाजिम हसवारे व म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी पोलिसात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही संतापाची लाट पसरली असून, आपल्या लाडक्या नेत्याच्या जीविताला धोका निर्माण करणार्‍या प्रवृत्तीचा पोलीस प्रशासनाने वेळीच शोध घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

विरोधकांनी अशी कितीही कटकारस्थाने रचली तरी आमचे नेते सुनील तटकरे हेच यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होतील. अशा धमकी पत्रांनी आमचे नेते व आम्ही कार्यकर्ते डगमगुन न जाता तालुक्यात प्रचाराची राळ उडवून विरोधकांना सळो की पळो करून सोडू असा विश्वास रविवार 24 मार्च रोजी रोहा नगरपरिषद कार्यालय समोरील चौकात तटकरे धमकी पत्राबाबत निषेध व्यक्त करताना केला.यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजयराव मोरे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा दिपिका चिपळूणकर, रोहा पं. स.सभापती राजेश्री पोकळे, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, अलिबाग विधानसभा अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष लक्ष्मण महाले, उपनगराध्यक्ष मयुर दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर, महिला आघाडी शहर अध्यक्षा श्रद्धा पाटणकर, सभापती नेहा पिंपळे, राम कापसे, रियाज शेटे, राजेंद्र पोकळे, मारुतीराव खरिवले, कादिर रोगे, अमित मोहिते, नगरसेवक मजीद पठाण अशोक धोत्रे, प्रथमेश खानोलकर, प्रमोद लोखंडे आदिंसह शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -