घरमुंबईटाटा हॉस्पिटलच्या पाच विभागांमध्ये रिक्तपदे?

टाटा हॉस्पिटलच्या पाच विभागांमध्ये रिक्तपदे?

Subscribe

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या पाच विविध विभागांमध्ये रिक्तपदे असल्याची माहिती मिळाली आहे. हे पाचही विभाग अत्यंत महत्त्वाचे आहेत.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे कर्करोग उपचारावर क्रमांक एकचे हॉस्पिटल असून जगभरात प्रसिद्ध आहे. पण, या हॉस्पिटलमधील पाच विभागांमध्ये अद्यापही १०० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या या रुग्णालयात प्रत्येक विभाग महत्वाचा असून रिक्त पदे असल्यास रुग्णसेवेला धोका पोहचणारे आहे. पण, टाटा मेमोरियल प्रमुख डॉ. राजेंद्र बडवे यांनी रिक्तपदांचा मुद्दाच खोडून काढला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलधील हॅड्रॉन बीम थेरपी, डायग्नोस्टिक अॅण्ड सर्व्हिसेस, कॅन्सर रिसर्च अॅण्ड न्यू क्लिअर मेडिसीन, वुमेन अॅण्ड चिल्ड्रन कॅन्सर विंग आणि कॅन्सर ग्रिड या विभागात रिक्तपदे असल्याची माहिती मिळाली आहे. हे पाचही विभाग अत्यंत महत्वाचे आहेत.

हेही वाचा – तंबाखू खाताय? २ लाख ६२ हजार लोकांना कर्करोगाची भीती

- Advertisement -

रिक्त असलेली पदे:

या विभागातून मेडिकल/सायंटिफिक ऑफीसर, ‘अ’ वर्ग नर्सेस, सायंटिफिक अॅसिस्टंट आणि टेक्निशियन ही पदे रिक्त आहेत. हॅड्रॉन बीम थेरपी या विभागाात वैद्यकीय/सायंटीक ऑफीसरची ३६, नर्स ‘अ’ वर्गातील १५, सायंटिफिक अॅसिस्टंट टेक्निशियनची ३४ पदे असे या विभागात एकूण मिळून ८५ जागा रिक्त आहेत. तर, डायग्नोस्टिक अॅण्ड सर्व्हिसेस विभागात मेडिकल/सायंटिफिक ऑफीसर ‘इ’ वर्ग ३०, नर्स ‘अ’ वर्ग ५४, सायंटिफिक अॅसिस्टंट / टेक्निशियन ३० मिळून ११४ जागा रिक्त आहेत. तर, कॅन्सर रिसर्च अॅण्ड न्यूक्लिअर मेडिसीन विभागातील मेडिकल सायंटिफिक ऑफीसर ‘ई’ वर्गातील ३२, नर्स ‘ए’ वर्गातील १०४, सायंटिफिक अॅसिस्टंट टेक्निशियन्स ५५ असे एकूण १९१ जागा रिक्त आहेत. तसेच वुमेन अॅण्ड चिल्ड्रन कॅन्सर विंग विभागातील मेडिकल सायंटिफिक ऑफिसर ”ई वर्गातील ४, नर्स ‘ए’ वर्गातील १० पदे अशी मिळून १४ रिक्त पदे आहेत. तर पाचव्या कॅन्सर ग्रिड विभागात मेडिकल सायटिफिक ऑफीसर ‘ई’ वर्ग ११, नर्स ‘ए’ वर्ग १०, सायंटिफिक अॅसिस्टंट टेक्निशियन्स २ असे एकूण मिळून २३ रिक्त जागा आहेत.

रिक्तपदांची माहिती खरी आहे. पण, हे सर्व पकल्प निर्माणाधीन आहेत. या पकल्पांना पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागेल. सहा महिने आधी प्रशिक्षण देऊन रिक्तपदे भरण्यात येतील. शिवाय अगदीच निवृत्त झालेली पदे रिक्त असतीलही. काही प्रकल्पांच्या इमारती तयार होत आहेत. अॅबट्रॅक्टमध्ये सहा नव्या इमारती तयार होत आहेत. तरीही रिक्तपदांचा विचार हॉस्प्टिल प्रशासन सतत करत आहे. तसेच झ्या जागा रिक्त आहेत, त्या नव्या असून ते प्रकल्पच अद्याप सुरु झालेले नाहीत.
– डॉ. राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वैद्यकीय प्रमुख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -