घरदेश-विदेशएअर इंडिया - कर्मचारी चोरत होते विमानातील अन्न

एअर इंडिया – कर्मचारी चोरत होते विमानातील अन्न

Subscribe

एअर इंडियाच्या विमानातून अन्न चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून हे कर्मचारी विमानातील राशन आणि इतर वस्तूंची चोरी करत होते.

भारताची स्वदेशी विमान कंपनी एअर इंडिया मागील काही वर्षांपासून तोट्यात सुरु आहे. एअर इंडियावर कोटींचे कर्ज आहे. एअर इंडियाला सावरण्याचे काम सरकारकडून केले जात असतानाच एअर इंडियातील विमानांमध्ये चोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनीने चार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये कॅटरिंग चे कर्मचारी आणि केबीन क्रू कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एअर इंडियाच्या विमानातून अन्ना बरोबरच इतर सामानही हे कर्मचारी चोरत असत. अनेकदा समज देऊनही या घटना घडल्यामुळे कंपनीने कारवाई केली आहे. या घटनेबद्दल एअर इंडियाच्या वतीने कोणतेही अधिकृत व्यक्त करण्यात आले नाही. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण

एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अश्विनी लोहानी यांनी २०१७ मध्ये एका पत्राद्वारे याची माहिती दिली होती. लांब पल्ल्यांच्या विमानातील अन्न आणि इतर वस्तू कर्मचारी खाजगी वापररासाठी करतात असे त्या पत्रात लिहिण्यात आले होते. विमानातून अन्न चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले होते. कॅटरिंग विभागातील २ कर्मचारी आणि केबीन क्रू विभागातील २ कर्मचाऱ्यांवरन निलंबनाची कारवाई करण्यात आली. कॅटरिंग विभागातील कर्मचाऱ्यांना ६३ दिवसांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांना ३ दिवसासाठी निलंबित करण्यात आले. या कर्मचाऱ्यांची बदली देशांअतर्गत विमानांमध्ये करण्यात आली आहे. लांब पल्ल्यांच्या विमानांमध्ये या कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -