घरमुंबईTata Power Company : घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर...

Tata Power Company : घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार

Subscribe

मुंबई : एप्रिलनंतर घरगुती विजदर वाढण्याची शक्यता आहे. टाटा वीज कंपनीच्या दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. टाटा कंपनी सोबत इतर विज पुरवठा करणाऱ्या कंपन्या देखील वीज दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. जर हा प्रस्ताव मान्यास झाला तर छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार पडणार. या प्रस्तावर जनतेच्या सुचना हरकती मागवल्यानंतर विज नियामक आयोग यावर निर्णय घेणार आहे. 2022-2023 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे.

एप्रिलपासून वीजदरवाढ करण्याचा प्रस्तावा राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला तर छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागणार आहे. 2022-23 आणि 23-24 या आर्थिक वर्षांसाठी आयोगाने मंजूर केलेले दर आणि प्रत्यक्षात मिळालेला महसूल याचा आधार घेत तूट भरून काढण्यासाठी टाटा कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे.

- Advertisement -

दरमहा 300 किंवा 500 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना बिले पाठविणे आणि ती वसूल करणे, हे काम कठीण आणि जास्त खर्चिक असते. या पार्श्वभूमीवर 0-100 युनिटसाठी तब्बल 201 टक्के वाढ प्रस्तावित आहे. 100 ते 300 युनिटपर्यंत 60 टक्के आणि 301 ते 500 युनिटपर्यंत 10 टक्के वाढीचा प्रस्ताव पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या प्रस्तावावर जनतेच्या सूचना व हरकती मागवल्या नंतर विज नियामक आयोग यावर निर्णय घेणार आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास टाटा कंपनीचे 500 युनिटपर्यंतचे दर अदानींच्या कंपनीपेक्षा अधिक असतील. त्यामुळे ग्राहक अदानींकडे परतण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -