घरमुंबईभास्कर जाधव यांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरेंची खास विमान व्यवस्था

भास्कर जाधव यांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरेंची खास विमान व्यवस्था

Subscribe

आगामी विधानसभा सभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जितकी शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश करण्याची घाई लागली आहे. तितकीच घाई शिवसेना-भाजपाच्या प्रमुखांना देखील या पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याची घाई लागली आहे. याचाच प्रत्यय आज भास्कर जाधव यांच्या राजीनाम्यावेळी आला. भास्कर जाधव हे आपला राजीनामा सही करून औरंगाबाद येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवू शकले असते. मात्र या सर्व प्रक्रियेला वेळ जाईल म्हणून चक्क शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यासाठी खास विमान व्यवस्था केल्याचे राजीनामा दिल्यानंतर भास्कर जाधव यांनी सांगितले. दरम्यान, भास्कर जाधव आज, शुक्रवारी २ वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधणार आहेत.

तर विधानसभा अध्यक्षांनी निवडला मोटार सायकलचा पर्याय

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे ही मागे राहिले नाही. भास्कर जाधव यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर बागडे यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा लगेच मंजूरदेखील केला.

- Advertisement -

गुहागरचे आमदार भास्कर जाधव गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेच्या वाटेवर होते. काही दिवसांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत त्यांची एक तास चर्चा झाली होती. त्यामुळे भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, त्यांचे अधिकृतपणे पक्षांतर झाले नव्हते. आता अखेर आज, १३ सप्टेंबरला पक्षांतर होणार असल्याचे निश्चित झाले. भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना भास्कर जाधव मंत्री देखील होऊन गेले आहेत. भास्कर जाधव २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्याअगोदर ते शिवसेनेत होते. मात्र, शिवसेनेकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -