घरमहाराष्ट्रशिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने जालन्यात आमदारांना अटक

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने जालन्यात आमदारांना अटक

Subscribe

शासणाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात बसवल्यामुळे आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

भर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नारायण कुचे यांनी मध्यरात्री आपल्या कार्यकर्त्यांसह अंबड शहरातील जालना रोडवर पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथाऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जालना तालुक्यात पुतळ्यावरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शासणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. मात्र, तरीही नारायण कुचे यांनी चौकावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी नारायण कुचे आणि त्यांच्या ४४ कार्यकर्त्यांना अटक केली.

हेही वाचा – भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; आज बांधणार शिवबंधन

- Advertisement -

आमदारांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी आमदार नारायण कुचे यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्यभंग प्रतिबंध अधिनियम कलम ११, १४३, १४९, ११८, ४४७ आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसारच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत नारायण कुचे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अंबड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, असा ठरवा मंजूर झाला आहे. याशिवय लोकांची कित्येक दिवसांची तशी मागणी होती, ती आज आमही पूर्ण केली’, असे कुचे म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -