घरमुंबईगेल्या ६ महिन्यांपासून शिवडी 'टीबी रुग्णालया'त शस्त्रक्रिया बंद

गेल्या ६ महिन्यांपासून शिवडी ‘टीबी रुग्णालया’त शस्त्रक्रिया बंद

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अशा शिवडी टीबी रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून 'शस्त्रक्रिया' बंद असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारकडून टीबी रुग्णांची संख्या कमी व्हावी आणि त्यासोबतच मृत्यूचं प्रमाण कमी व्हाव यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण, दुसरीकडे टीबीवर करण्यात येणाऱ्या गंभीर आणि अवघड शस्त्रक्रिया आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शिवडी टीबी रुग्णालयात होत नसल्याचं समोर आलं आहे. टीबीच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांसोबत डॉक्टरही टीबी रुग्णालयात जाण्यास घाबरत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.

डॉक्टरच नसल्याने रुग्णांची गैरसोय

एमडीआर आणि एक्सडीआर लेवलच्या टीबी रुग्णांमध्ये अनेकदा फुप्फुस काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया केला जातात. त्यासोबतच विंडो सर्जरी देखील केली जाते. अशा गंभीर आणि अवघड शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात अनेकदा बाहेरुन सर्जन दाखल होतात. पण, त्यांच्या मदतीसाठी हवे असलेले दोन निवासी डॉक्टर्स उपलब्ध नसल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. शिवडी टीबी रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ६ महिन्यांपासून रुग्णालयात मोठ्या आणि गंभीर शस्त्रक्रिया केल्या जात नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

६ महिने शस्त्रक्रिया बंद

टीबी रुग्णांमध्ये २५ टक्के एमडीआर आणि एक्सडीआर रुग्णांवर अख्ख फुप्फुस काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. शिवडी टीबी रुग्णालयात आठवड्याला ४ वेळा सुप्रा मेजर म्हणजेच गंभीर शस्त्रक्रिया केल्या जातात. पण, गेले ६ महिने अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया बंद असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मोठ्या शस्त्रक्रियांसाठी चांगली टीम लागते. शस्त्रक्रियेच्या वेळेस सर्जन्सही बाहेरुन उपलब्ध होतात. पण, त्या सर्जन्सच्या मदतीसाठी हवे असणारे दोन निवासी डॉक्टर्स इथे नाहीत. त्यामुळे, गेल्या ६ महिन्यांपासू या गंभीर शस्त्रक्रिया बंद आहेत. कारण, आमच्याकडे बॉन्ड कॅडिडेट नाही आहेत. नाहीतर इथे केलेल्या शस्त्रक्रियेचा ९५ टक्के यश येतं. अनेकदा निवासी डॉक्टरांसाठी विचारणा केली आहे. पण, कोणीच यायला तयार होत नाही ही खंत आहे. सर्व क्षेत्रात डॉक्टर जातात पण, टीबी रुग्णालयात काम करायला तयार होत नाहीत. एमडीआर आणि एक्सडीआर लेवलमध्ये वाढलेल्या टीबीत फुप्फुस पूर्णपणे खराब होतं त्यावेळेस एका बाजूचं फुप्फुस संसर्ग पसरु नये यासाठी काढून टाकावं लागतं. यासाठीच तज्ज्ञ सर्जन्सची आणि निवासी डॉक्टरांची गरज असते. आतापर्यंत २५ टक्के लोकांची फुप्फुसे काढण्यात आली आहेत.  – डॉ. ललितकुमार आनंदे, शिवडी टीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक

- Advertisement -

हेही वाचा – ५० टीबी रुग्णांवर ‘बेडाक्युलीन’ चा यशस्वी उपचार

हेही वाचा – टीबी रुग्ण दाखवा ५०० रुपये मिळवा!


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -