घरमुंबईशिवडी टीबी रुग्णालय: नर्सच्या संपाचा रुग्णांना फटका

शिवडी टीबी रुग्णालय: नर्सच्या संपाचा रुग्णांना फटका

Subscribe

शिवडी टीबी रुग्णालयातील नर्सनी सकाळपासून अचानक सुरु केलेल्या कामबंध आंदोलनाचा फटका रुग्णांना बसत आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शिवडी टीबी रुग्णालयातील नर्सनी गुरुवारी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे रुग्णांना त्याचा फटका बसतो आहे. पालिका प्रशासनाने चार नर्सवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ नर्सनी संप पुकारला आहे. अचानक सुरू झालेल्या या संपामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. रुग्णांना योग्य सुविधा न मिळाल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वूी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी शिवडी टीबी रुग्णालयातील चार नर्सवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. या कारवाईत चार नर्सना निलंबित करण्यात आले होते. पालिकेच्या या निर्णया विरोधात रुग्णालयातील नर्सनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

- Advertisement -

डॉक्टरांना मोठ्या अडचणी

शिवडी टीबी रुग्णालयातील नर्सनी सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले. हे आंदोलन कुठल्याही पुर्व कल्पनेशिवाय केले गेले. त्यामुळे या रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिचारिका अतिरिक्त आयुक्तांच्या भेटीला रवाना

आता याच प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सर्व परिचारिका मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए.कुंदन यांना भेटीसाठी गेल्या आहेत. त्यामुळे हा संप कायम राहील की नर्स पुन्हा आपल्या कामावर रुजू होतील हा निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -