घरमुंबईचोरलेला फोन 'तिने' काढला शोधून, चोराच्या आवळल्या मुसक्या

चोरलेला फोन ‘तिने’ काढला शोधून, चोराच्या आवळल्या मुसक्या

Subscribe

फोन चोरीला गेल्यानंतर चोराच्या प्रत्येक हालचालीवर झीनतचे लक्ष होते. त्याने रजनीकांतच्या काला चित्रपटातील गाणे पाहिले होते. या शिवाय त्याने फोनमध्ये सेल्फी देखईल काढले होते.

रेल्वे प्रवासात रोज कित्येकांचे फोन चोरीला जातात. एकदा फोन चोरीला गेला तर तो पुन्हा मिळण्याची शक्यता नसतेच. पण एका तरुणीने फोन हरवल्यानंतर फोन शोधून काढण्याची जिद्द तिने काही सोडली नाही. तिने हरवलेला फोन शोधूनच काढला आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने चोरांच्या मुसक्या आवळल्या. या शेरलॉक होम्स तरुणीचे नाव झीनत हक असून तिने तीन दिवस चोरावर नजर ठेवली. आणि आपला फोन मिळवला.

zheenat_find_her_phone
शेरलॉक होम्स बनत फोन शोधणारी झीनत हक

नेमका कसा सापडला फोन?

अंधेरीतील मरोळ भागात झीनत राहते. ५ ऑगस्टला प्रवासादरम्यान तिचा शाओमीचा रेडमी ४ हा फोन रात्री १० च्या सुमारास हरवला. फोन नेमका कधी हरवला या गोंधळात ती होती. घरी गेल्यावर तिने दुसऱ्या फोनमधून तिने गुगल अकाऊंट सुरु केले. त्यावेळी चोराने तिचे गुगल अकाऊंट तसेच सुरु ठेवल्याचे तिला कळाले. त्यावरुन ती त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती. दिवसभरात त्याने काय काय केले ? हे तिला कळतं होते. त्याचे लोकेशन देखील तिला समजत होते. ६ ऑगस्टला चोर मालाडमधील डिमार्टमध्ये येऊन गेल्याचे देखील तिला गुगल लोकेशनवरुन कळाले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा तिच्या हाती लागला तो म्हणजे चोराने फोनमध्ये रेल्वे तिकीट बुक करण्याचे अॅप डाऊनलोड करुन त्या ६ ऑगस्टच्या रात्रीचे तिकीट काढले. तिकीट दादर ते तिरुवण्णामलई या गाडीचे पॉन्डिचेरी पर्यंतचे तिकीट काढले. झीनतने पोलिसांना सगळी माहिती दिली आणि गाडी यायच्या आत ती दादरला रेल्वे पोलिसांसह हजर राहिली. या आधी तिने गुगल अकाऊंटवरुन त्याने काढलेला त्याचा सेल्फीही पाहिला होता. त्यामुळे दादरला आल्यावर तिने त्या चोराला ओळखले आणि पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.

- Advertisement -

चोर रजनीकांतचा फॅन

फोन चोरीला गेल्यानंतर चोराच्या प्रत्येक हालचालीवर झीनतचे लक्ष होते. त्याने रजनीकांतच्या काला चित्रपटातील गाणे पाहिले होते. या शिवाय त्याने फोनमध्ये सेल्फी देखईल काढले होते. या शिवाय त्याने व्हॉटसअप, फेसबुकदेखील वापरले होते. गुगल अॅक्टिव्हिटिजमध्ये बॅटरीचा होणारा वापर देखील कळतो. त्यावरुन चोरी केल्यानंतर हा फोन बराच वापरण्यात आल्याचे देखील तिला लक्षात आले.

कसा कराल तुमचा फोन सुरक्षित?

जर तुम्ही अँड्राईड फोन वापरत असाल तर गुगल अकाऊंट लॉग इन करा.

- Advertisement -

तुमच्या फोनचे लोकेशन नेहमी ऑन ठेवा. जेणेकरुन दुसऱ्या फोनमधून तुम्हाला लगेच फोनचे लोकेशन कळेल. ( पण हे फोन हरवल्याच्या काही मिनिटांपर्यंतच शक्य आहे)

तुमचा फोनमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचे गुगल अकाऊंट त्वरीत साईन आऊट करा.

तुमचे व्हॉटसअप दुसऱ्या फोनमध्ये सुरु करा. फेसबुकचा पासवर्ड त्वरीत बदला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -