घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' द्या!

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ द्या!

Subscribe

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना केंद्र सरकारच्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना केंद्र सरकारच्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भुजबळ यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांनी ३० जुलै २०१८ रोजी वयाच्या नव्वदीत पदार्पण केले आहे. सुलोचनादीदी या भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग बनून राहिल्या आहेत.

मराठी इतकेच हिंदीतही योगदान

साधारण ४०० हून अधिक हिंदी- मराठी आणि इतर भाषातील सिनेमात त्यांनी कसदार, सशक्त भूमिका साकारलेल्या आहेत. ‘सरस्वतीचंद्र’, ‘कोरा कागज’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या गाजलेल्या हिंदी सिनेमांमधून त्यांनी प्रेमळ आईची भूमिका साकाऱली आहे. तर ‘मीठ भाकरी’, ‘साधी माणसं’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीन’ आणि ‘मराठा तितुका मेळवावा’ या मराठी चित्रपटांमधून त्यांनी अतिशय दमदार भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisement -

चित्रपटसृष्टीत ७५ वर्षांच योगदान

सुलोचना दीदी यांचे चित्रपटसृष्टीमध्ये ७५ वर्षांचे योगदान दिलेले आहे. कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत मराठी आणि हिंदी पडद्यावर झळकणारं मराठमोळं नाव म्हणजे सुलोचनादीदी. चित्रपटसृष्टीतील गाढा अभ्यास आणि अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपले अवघे आयुष्य खर्ची घालूनही त्यांना अद्याप केंद्र शासनाचा ‘दासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सुलोचनादीदींना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार

  • पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण
  • फिल्मफेअरचा लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -