घरट्रेंडिंगआता फक्त ५ जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

आता फक्त ५ जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

Subscribe

देशभरात सोशल मीडियावरील अफवांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भारत सरकारने व्हॉट्सअॅपला याविरोधात उपाय करण्यास सांगितले होते. त्याची अंमलबजावणी करत व्हॉट्सअॅपने आता हे नवीन फिचर आणले आहे.

आपल्याला एखादा मेसेज,फोटे किंवा व्हिडिओ आवडला किंवा माहिती लोकांना पाठवावीशी वाटली तर ‘लगे हाथ’ आपण तो मेसेज अनेक लोकांना पाठवतो. आपण जे काही फॉरवर्ड करतोय, त्यांची शाहनिशा करण्याची तसदीदेखील घेत नाही. परंतु अनेकदा असे केल्यामुळे चुकिची माहिती आणि अफवा पसरतात. फेक न्युजचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. पंरतु व्हॉट्सअॅपने आता एक नवीम फिचर आणलंय. या नव्या फिचरमुळे आता एका वेळी केवळ ५ जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार. अफवां पसरू नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे गेल्या महिन्यात कंपनीने जाहीर केले होते. त्यामुळे आता भारतातील व्हॉट्सअॅप युजर्ससाठी हा नियम आजपासून लागू झाला आहे. आता एकाचवेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही.

का आणावं लागलं हे फिचर

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवरील अफवेमुळे काही मुलांच्या ग्रूपला मूले पळवणारी टोळी समजून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर गोहत्येवरुनही अफवा पसरल्या तसेच गायींची तस्करी करणारे समजून काही लोकांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. यासोबतच देशभरात व्हॉट्सअॅपवरील अफवांमुळे अनेक दुर्घटना घडल्या. याबाबत भारत सरकारने देशातील सोशल मीडिया साईट्सना ठणकावले. त्यातही प्रामुख्याने फेसबुक व व्हॉट्स अॅपसारख्या मेसेजिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कडक पावले उचलण्यास सांगितले होते. अफवांचा प्रचार प्रसार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जावी, असेही सुचवले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपने तातडीने पावले उचलत नवीन अपडेट आणले आहे. त्यामुळे हे नवीन फिचर लागू करण्यात आले आहे.

- Advertisement -

जागतिक स्तरावरही परिणाम

याआधी व्हॉट्सअॅपवर मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नव्हती. परंतु भारतात ही मर्यादा पाचपर्यंत कमी करण्यात आली. त्यासोबतच याचे परिणाम जागतिक स्तरावरदेखील झाले आहेत. त्यामुळे आता भारताव्यतिरिक्त इतर देशात व्हॉट्सअॅपवरील मसेज सेंड करण्याची मर्यादा २० पर्यंत कमी करण्यात आली आहे.

कसे आहे नवे फिचर?

जेव्हा आपण व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज फॉरवर्ड करतो. तेव्हा कॉन्टॅक्टसची लिस्ट ओपन होते. त्यानंतर आपण हवे तितक्या कॉन्टॅक्ट्सना मेसेज शेअर करतो. परंतु या फिचरमुळे आता आपण जेव्हा कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करु, पाच कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट केल्यानंतर पुढे पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करायचा प्रयत्न केल्यास “तुम्ही केवळ पाच जणांना हा मेसेज सेंड करू शकता”, असे नोटिफिकेशन येते. तसेच एखादा व्हीडियो, फोटो किंवा ऑडियो मेसेज जर पाच वेळा फॉरवर्ड केला असेल तर त्यानंतर त्या युजरला तो मेसेज आणखी युजरला फॉरवर्ड करताच येणार नाही. त्यामुळे एक मेसेज केवळ पाच वेळा पाच जणांना सेंड करु शकतो. त्यामुळे एक मेसेज जास्तीत जास्त २५ लोकांना सेंड करता येणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -