घरमुंबईनवी मुंबईच्या तेजस्विनी बसेस थांबल्या रंगसंगतीसाठी

नवी मुंबईच्या तेजस्विनी बसेस थांबल्या रंगसंगतीसाठी

Subscribe

नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित अशा महिलांसाठी असणाऱ्या तेजस्विनी बस शहरात दाखल होण्यासाठी रंगांचा अडसर ठरत आहे. रंगसंगती ठरत नसल्याने या बसेसचे नवी मुंबईतील आगमन काहीसे उशिरा होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित अशा महिलांसाठी असणाऱ्या तेजस्विनी बस शहरात दाखल होण्यासाठी रंगांचा अडसर ठरत आहे. रंगसंगती ठरत नसल्याने या बसेसचे नवी मुंबईतील आगमन काहीसे उशिरा होण्याची शक्यता आहे. या तेजस्विनी बससाठी गुलाबी किंवा आकाशी रंग देण्याचे ठरले होते. सध्या बसचा रंग लाल असून त्यावर पट्टा कोणत्या रंगाचा द्यायचा यावर राज्य शासनाकडून शिक्कामोर्तब न झाल्याने या बसेस नवी मुंबईच्या सेवेत येण्यापासून रखडल्या आहेत.

राज्यात प्रथमच फक्त महिलांसाठी सेवेत

नवी मुंबई महापालिकेने खास महिला वर्गासाठी टाटा कंपनीच्या १० तेजस्विनी बस खरेदी केल्या आहेत. खास महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या या बससाठी नवी मुंबई महापालिका खास महिला तसेच तृतीपंथीयांना चालक म्हणून संधी दिली जाणार आहे. त्यामुळे महिला आणि तृतीयपंथीय चालक देणारी पालिका म्हणून राज्यात पहिला मान हा नवी मुंबई महापालिकेला मिळत आहे. अद्याप कोणीही तृतीयपंथीय चालक पालिकेला मिळाले नसल्याने महिलाच प्रशिक्षण घेत आहेत. सध्या दोन महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्या महिलांना सेवा देण्यास तयार असून इतर तीन महिलांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. पालिकेने नुकतेच केंद्र शासनाकडून पर्यवारण पूरक अशा बसेसची खरेदी केली आहे. या बसेसच्या चाचण्या झाल्या असून रंग कोणता असायला हवा यावर निर्णय अद्याप राज्य शासन दरबारी झाला नसल्याने या बसेस खोळंबल्या आहेत. तसेच या बसवर तेजस्विनीचा लोगो करण्याची संधी नवी मुंबई महापालिकेला मिळालेली आहे.

- Advertisement -

महिलांसाठी ही स्पेशल बस

या बसेस खास महिलांसाठी असल्याने बसेसवर स्टिकर्स लावणे तसेच महिलांमध्ये जनजागृती करता येणारी घोषवाक्ये लिहिण्यात येणार आहेत. या बसेस क्लचविरहित आणि ऑटोगेअर असल्याने तसेच महिला चालक-वाहक असल्याने त्यांना हाताळणे सोपे होणार आहे. सर्व बाबी पूर्ण झालेल्या असून या बसेस रंगांसाठी थांबलेल्या असल्याने नवी मुंबईतील महिलांना वाट पाहावी लागणार आहे. ज्याप्रमाणे रेल्वेत महिलांसाठी वेगळा डबा असतो. त्याप्रमाणे फक्त महिलांसाठी ही स्पेशल बस असल्याने यापुढे नवी मुंबईतील महिलांचा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र काही दिवस त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -