घरमुंबईदहावीचा अर्ज भरण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

दहावीचा अर्ज भरण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Subscribe

दहावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.दहावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात आता आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांची नियमित शुल्काने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

२४ ते २८ पर्यंत मुदत 

विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २४ ते २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शाळांना बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीची मुदत दिली आहे. शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे जमा करण्यासाठी ५ डिसेंबर ही तारीख दिली आहे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चि त केलेल्या बॅंकेच्या खात्यामध्ये जमा करून चनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात, असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -