११ वर्षीय यशची किमया; कागदी ग्लासापासून बनवला पर्यावरण पूरक मखर

गणेशोत्सव म्हटला की बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण येते. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी विचार येतो तो गणपतीच्या मूर्तीचा आणि तिच्यासाठी आकर्षक डेकोरेशनचा. ठाण्यातील लोकमान्य नगरमध्ये देशमाने कुटुंबात अकरावर्षीय यशने केलेले कागदी ग्लासचे डेकोरेशन नगरात चर्चेचा विषय झाला आहे.

गणेशोत्सव म्हटला की बच्चे कंपनीच्या उत्साहाला उधाण येते. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी विचार येतो तो गणपतीच्या मूर्तीचा आणि तिच्यासाठी आकर्षक डेकोरेशनचा. ठाण्यातील लोकमान्य नगरमध्ये देशमाने कुटुंबात अकरावर्षीय यशने केलेले कागदी ग्लासचे डेकोरेशन नगरात चर्चेचा विषय झाला आहे. 11 वर्षीय यश सध्या संकेत विद्यालयामध्ये इयत्ता 6 वीत शिकत आहे. गणेशोत्सवाकरिता यंदा मखर कोणत्या प्रकारे असावेत याबाबत यशने गुगलवर सर्च केले असता त्याला प्लास्टीकच्या ग्लासांचा वापर करून मखर बनवण्यात आलेले दिसले. मात्र प्लास्टीकबंदी मुळे आपण त्याजागी कागदाचे ग्लास वापरू शकतो हे त्याने आपल्या काकांना सांगितले. आणि कागदाच्या ग्लासाच्या मखरची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या मकरासाठी यशने ५५० कागदी ग्लास वापरले आहेत. विशेष म्हणजे हे ग्लास अशा पद्धतीने चिटकवले आहेत की, गणेश विसर्जनानंतर हे ग्लास पुन्हा वापरता येतील. या ग्लासांचा वापर अनंतचतुर्थीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पाणी वाटपाकरिता करण्यात येणार आहे.

२०१६ मध्ये यशने वापरलेल्या सीडी, डीव्हीडींचा वापर करून मकर तयार केला होता. 2017 ला आईक्रीमच्या काड्या वापरून मकर तयार केला. यंदा कागदी ग्लासेस याचा वापर करण्यात आला आहे. आम्ही संपूर्ण कुटुंब यानिमित्त एकत्र येऊन यशला मकर बनवण्यासाठी मदत करतो. – सचिन देशमाने (यशचे काका)

आमच्या शाळेमध्ये आम्हाला पर्यावरणाला हानीकारक गोष्टींबद्दल माहिती सांगितली जाते. शिवाय वेगवेगळे प्रोजेक्ट देखील बनवण्यास सांगतात. यावेळी गुगलवर सर्च करून मी वेगवेगळे मखर पाहिले त्यात मला हा मखर बनवण्याची आयडीया मिळाली. मी आणि काकांनी मिळून हा मकर तयार केला.-यश नितीन देशमाने (इयत्ता 6 वी, संकल्प विद्यालय, ठाणे)