घरमुंबईवाझेचा ताबा घेण्यापूर्वीच एटीएसला धक्का, तपास आता एनआयएकडे

वाझेचा ताबा घेण्यापूर्वीच एटीएसला धक्का, तपास आता एनआयएकडे

Subscribe

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सचिन वाझे याचा ताबा मिळवण्यासाठी धडपडणार्‍या एटीएसला जोरदार झटका बसला आहे. एनआयएने बुधवारी ठाणे न्यायालयात मनसुख हिरेन हत्येच्या तपासासाठी धाव घेतली असता न्यायालयाने मनसुख हिरेन हत्येचा तपास थांबवण्याचे आदेश एटीएसला दिले असून सदर तपास एनआयएला सोपवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे एटीएसला जोरदार झटका बसला आहे. बुधवारी सायंकाळी एटीएसकडून या तपासाची सर्व कागदपत्रे आणि आणि आरोपीचा ताबा एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्याकडे असून मनसुख हिरेन हत्येचा तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्याकडे होता. मात्र, या दोन्ही गुन्ह्यांचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात सचिन वाझे हे मुख्य आरोपी असून सध्या वाझे हे एनआयएच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्याचा तपास एकाच तपास यंत्रणेकडून झाला पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले होते व मनसुख हिरेन हत्येचा तपास हा एनआयएकडे सोपवण्याचे आदेश केंद्राने दिले होते. केंद्राच्या या आदेशाला चार दिवस उलटूनही एटीएसने या गुन्ह्याची कागदपत्रे एनआयकडे सुपूर्द न करता तपास सुरू ठेवला होता.

- Advertisement -

उलट मनसुख हिरेन या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे असून त्याचा ताबा मिळवण्यासाठी एटीएसने ठाणे न्यायालयाकडून ट्रान्सफर वॉरंट मिळवून एनआयए न्यायालयात वाझे याचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. पण, एनआयएने बुधवारी ठाणे न्यायालयात धाव घेऊन हिरेन हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे आदेश असून देखील एटीएस या आदेशाचे पालन करीत नसल्याचे न्यायालयाला अर्जाद्वारे कळवले होते.

‘अखेर ठाणे मुख्य न्यायालयाने याअर्जावर सुनावणी देत हिरेन हत्येचा तपास थांबवण्याचे आदेश एटीएसला दिले आणि बुधवारीच गुन्ह्याची सर्व कागदपत्रे आणि अटक आरोपीचा ताबा आणि हस्तगत मालमत्ता एनआयएकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे एटीएसला जोरदार झटका बसला असून एटीएसने या गुन्ह्याचा तपास थांबवून बुधवारी सायंकाळी संपूर्ण सोपस्कार पूर्ण करून तपास एनआयकडे सोपवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -