घरमुंबईठाणे शहर स्मार्ट सिटी केवळ कागदावरच

ठाणे शहर स्मार्ट सिटी केवळ कागदावरच

Subscribe

ठाणे स्मार्ट सिटीकरीता केंद्र शासनाकडे 5496 कोटी रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक बनवून पाठविण्यात आले. त्यापैकी केंद्र सरकारकडून ठाणे महापालिकेला 2014 पासून 2019 पर्यंत सुमारे 203 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र उपलब्ध निधीपैकी मागील 5 वर्षात फक्त 20 टक्केच निधी आतापर्यंत ठामपा प्रशासनाने खर्च केला असल्याची बाब उघड झाली आहे. सदर बाब मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात समोर आली होती. राज्यशासनाने याची दखल घेत ठामपाला याबाबत विचारणा केली असता ठामपा प्रशासनाने तात्काळ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेतली. या बैठकीत अनेक प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. मात्र यापैकी अनेक प्रकल्प अद्यापही कागदावरच आहेत. मिळालेल्या निधीचे योग्य नियोजन न करण्यात आल्यामुळे ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे.

स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत 2016-17 मध्ये 61 कोटी व 2017-18 मध्ये 129 कोटी रुपये मिळाले आहेत. स्वच्छ भारत अभियान योजनेसाठी 2016-17 मध्ये 1 कोटी 56 लाख 72 हजार मिळाले आहेत तर अमृत अभियान अंतर्गत 2017-18 मध्ये 12 कोटी 8 लाख रुपये मिळाले आहेत. अशी 203 कोटी रुपये रक्कम ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जमा असताना आता पर्यंत फक्त 41 कोटी रुपयेच खर्च करण्यात आले आहेत. मासुंदा तलाव नूतनीकरण, खारेगाव चेकनाका येथील चौपाटी, डीजी ठाणे इत्यादी मोजक्याच कामांसाठी केंद्र शासनाचा निधी वापरण्यात आला आहे. तर ठाणे आणि मुलुंड दरम्यान रेल्वे स्टेशन या प्रकल्पासाठी 289 कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे.

- Advertisement -

बहुचर्चित परंतु अंमलबजावणी न केलेला क्लस्टर पुनर्विकास योजनेसाठी 3 हजार 974 कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. तीनहात नाका सुधारण्यासाठी 239 कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. महापालिकेच्या शाळा व महापालिका यांच्या छतावर सौरऊर्जा निर्माण करणारे छत्र निर्माण करण्यासाठी 72 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट वॉटर मीटर साठी 93.19 कोटी.वॉटरफ्रन्ट डेव्हलपमेंट करिता 221.50 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र यापैकी अनेक प्रकल्पांचे नियोजन अद्यापही झालेले नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने ठाणे शहराची वाटचाल कधी सुरु होणार असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

लोकहिताच्या शहराच्या विकासाच्या विविध योजना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आल्या आहेत. त्यातील काही योजना प्रगतीपथावर आहेत. काही सुरू झाल्या पण त्या संथ गतीनं सुरू आहेत. काही योजना अद्यापही सुरू झाल्या नसतील, त्या योजना प्रामाणिकपणे या वर्षात सुरू करता येतील का, किंवा करताच येणार नसतील तर तसे मान्य करून त्याऐवजी नवीन काही योजना करता येतील का, याचा विचार होईल.
– संजीव जैस्वाल आयुक्त ठाणे महानगर पालिका

- Advertisement -

ठाणे महापालिका केंद्र शासनाकडून आलेला निधी विकासकामांसाठी वापरू शकलेली नाही. याची ठाणेकरांना स्पष्टीकरण द्यावे.योग्य नियोजन नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी पडून असून ठाणे शहर कधी आणि कसे स्मार्ट होईल. ठाणे महानगरपालिका केंद्र सरकारला कर रुपात एवढे उत्पन्न देत असताना ठाणे शहराला 5 वर्षात फक्त 203 कोटी रुपये एवढे कमी अनुदान का?
संदीप पाचंगे, ठाणे शहर सचिव मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -