घरमुंबईलोकसहभागातून जिल्हा परिषद बांधणार ५ हजार वनराई बंधारे

लोकसहभागातून जिल्हा परिषद बांधणार ५ हजार वनराई बंधारे

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण क्षेत्रात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून तब्बल ५ हजार वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयतीचे औचित्य साधत बुधवार, २ ऑक्टोबरपासून वनराई बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या वनराई बंधाऱ्याच्या पाण्यावर विविध भाजीपाला लागवड, कडधान्य, तसेच रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणत करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखिल पाणी जमिनीमध्ये जिरणे ऐवजी वाहून जाते. त्यामुळे सरासरी इतका पाऊस पडून देखील भूजल पातळीत घट झालेली पाहायला मिळते. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून वनराई बंधारे बांधणे महत्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर आदि पाच ग्रामीण तालुक्यांना बंधाऱ्यांचे लक्षांक देण्यात आले आहेत. या लक्षांकानुसार पाचही तालुक्यात ५ हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना १५००, भिवंडी १००० आणि कल्याण तसेच अंबरनाथ तालुक्यांना प्रत्येकी ५०० असे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग कार्यरत असतो. या विभागाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात. या विभागाच्या माध्यमातून देखिल नोव्हेंबर–डिसेंबर कालावधीत वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे.

- Advertisement -

वनराई बंधारे बांधल्यामुळे होतील फायदे

वनराई बंधारे बांधल्यामुळे पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी वर येण्यास मदत होईल. भाजीपाला, कडधान्य तसेच रब्बी पिकाच्या लागवड मोठ्या प्रमाणात करता येईल. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त दैनदिन वापरासाठी उदा. कपडे घुणे, इत्यादीसाठी या पाण्याचा वापर करता येईल. तसेच शेतीसाठी उपयोगी असलेल्या जनावरांनाही वनराई बंधाऱ्यामुळे पाणी उपल्बध होईल. जंगलातील पशुपक्षी यांच्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. त्याच बरोबर टंचाई कमी होऊन उन्हाळ्यात पाण्याचे टँकर लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -