घरमुंबईयुतीचा तिढा सुटूनही ठाण्यात शिवसेनेचे नाराजीचे सूर

युतीचा तिढा सुटूनही ठाण्यात शिवसेनेचे नाराजीचे सूर

Subscribe

युतीच्या जागा वाटपात ठाणे शहर विधानसभा मतदार संघ हा भाजपच्या वाट्याला गेला आहे. मंगळवारी भाजपकडून विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजप कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. हा मतदार संघ शिवसेनेला न मिळाल्यास असहकार्याची भूमिका सेनेने घेतली आहे. त्यामुळे ठाण्यातही शिवसेना भाजपमधील वाद रंगणार असल्याचे दिसून येते.

विद्यमान आमदारालाच पुन्हा संधी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र पणे लढले होते. त्यावेळी भाजपचे संजय केळकर हे निवडून आले. ठाणे सेनेचे बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र भाजप हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हती त्यामुळे जागा वाटपाच्या वादात युती अडकली होती. जागा वाटपाचा तिढा सुटल्याने युती जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतच ठाणे शहर विधानसभेतून केळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना या मतदारसंघावर अडून बसली होती.

- Advertisement -

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची काम न करण्याची भूमिका

ठाणे शहर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी सोमवारी टेंभीनाक्यावरील आनंद मठात शिवसैनिकांनी बैठक घेऊन, भाजपचे काम करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. आता हा मतदार संघ भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाला आहे. सेनेचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक नाराज झाले आहेत. भाजपच्या ठाणे शहर जिल्हा कार्यालयात ढोल ताशा वाजवून कार्यकत्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार केळकर म्हणाले की, सेना-भाजपचे शिस्तबध्द कार्यकर्ते आहेत. महायुतीचे पदाधिकारी नाराजी कार्यकत्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील. मात्र, शिवसेनेने काम न करण्याची भूमिका घेतल्याने केळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येते. यातून सेना भाजपतील वरिष्ठ मंडळी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष वेधलय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -