घरमुंबईमतदानाच्या जनजागृतीसाठी धावले ठाणेकर

मतदानाच्या जनजागृतीसाठी धावले ठाणेकर

Subscribe

लहानग्यांपासून ते वयोवृध्दापर्यंत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू पासून गृहिणीपर्यंत साऱ्यांनीच जिल्हाधिकारी कार्यालय कोर्टा नाका येथे आज, रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. एकाच रंगाचे टी-शर्ट परिधान केलेल्या या सगळ्यांनीच एक धाव मतदानासाठी, असा संदेश देत दौड केली. निमित्त होते, रन फॉर व्होट मॅरेथॅान स्पर्धेचे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.

जिल्हातील १८ मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत नागरिकांनी मतदान करावे आणि लोकशाहीला बळकट करावे यासाठी मतदान जनजागृती मॅरेथॅानचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी, ठाणे व माइल्स टू गो यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

सुरुवातीला सर्व सहभागी खेळाडूंना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शुभेच्छा देवून मतदान करण्याचे आवाहन केले. ही स्पर्धा १० किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर अशा तीन किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत ५ वर्षापासून अगदी ८० वर्षाच्या वृद्ध व्यक्तींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व विजेत्या स्पर्धकांना नार्वेकर यांच्या हस्ते पदक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी अपर्णा सोमाणी उपस्थित होत्या.

ठाणेकर धावले

अधिकाऱ्यांनी केली ५ किलोमीटर दौड पूर्ण

सकाळ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने प्रशासनातील अधिकारी –कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी उप जिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी ५ किलोमीटर ची दौड यशस्वी पूर्ण केली.

- Advertisement -

सेल्फी पॉईटवर गर्दी

यावेळी सेल्फी पॉईट तयार करण्यात आला होता. तरुणांसह, गृहिणी, ज्येष्ठ नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.

ठाणेकर धावले

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धकांनी घेतला सहभाग

  • या स्पर्धेत विजया भट (आंतरराष्ट्रीय खेळाडू)
  • श्रद्धा रननावरे (आंतरराष्ट्रीय धावपटू)
  • नंदा शेट्टी (आंतरराष्ट्रीय खेळाडू)
  • गुरुमूर्ती नायक (राष्ट्रीय धावपटू)
  • प्रशांत सारंग (राष्ट्रीय धावपटू)

हेही वाचा –

प्रचाराचा शेवटचा रविवार; महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभांचा धडाका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -