घरमुंबईएफडीएचे अधिकारी निवडणुकीच्या कामाला

एफडीएचे अधिकारी निवडणुकीच्या कामाला

Subscribe

निवडणुका तोंडावर आल्या की निवडणूक अधिकारी कामाला लागतात. त्यांच्यासोबत इतरही अधिकाऱ्यांना कामाला लावलं जातं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामात ‘एफडीए’चे अधिकारी पुन्हा एकदा भरडणार असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाच्या दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अशा पदार्थांवर आणि ते विकणाऱ्यांवर करडी नजर ठेऊन असतात. शिवाय, अशा लोकांवर कारवाई केली जावी, यासाठी मोहिमसुद्धा राबवल्या जातात. दिवाळी सणाच्या तोंडांवर महिनाभर आधीपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त पदार्थांना प्रतिबंध करण्यासाठी कारवाया सुरू होतात. यंदाच्या दिवाळीला मात्र अद्याप विभागाकडून होणाऱ्या कारवायांची माहिती मिळत नाही. त्यामुळे एफडीएच्या थंडावलेल्या कारवाईत या दिवाळीत भेसळयुक्त कारभार करणाऱ्यांचे फावणार की काय?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिवाळीच्या फराळाला लागणारे पदार्थ तेल, रवा, खवा, मावा विविध डाळींच्या पीठांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यामुळे, एफडीएकडून भेसळीच्या पदार्थांवर विशेष लक्ष ठेवलं जातं. पण, येत्या २१ ऑक्टोबर विधानसभा निवडणूक आहे. त्यापाठोपाठ लगेचच दिवाळसण असल्यामुळे यंदाच्या दिवाळीत भेसळ करणाऱ्यांचे फावणार आहे. या निवडणूक कामांमुळे प्रशासनाच्या प्रयोगशाळेत होत असलेल्या चाचण्यांनाही विलंब होणार आहे. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात येते. विशेष म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाकडेच मनुष्यबळ कमी असल्याची माहिती ही समोर आली आहे.

- Advertisement -

राज्यातील अन्न आणि औषधांच्या संदर्भातीलही एफडीएकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण सातत्याने वाढते. पण, निवडणुकीच्या कर्तव्यावर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत. यासाठी त्यांना प्रशिक्षणही सुरु झाले आहे. या दरम्यान त्यांना मोबाईल स्वीच ऑफ ठेवण्यास सांगितले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जिन्नसांच्या आणि मिठाईच्या दुकानांमध्ये पदार्थांचा दर्जा कोण तपासणार?, असा सवाल निर्माण झाला आहे. तर, अन्न आणि औषध प्रशासन विभागात अधिकाऱ्यांच्या असलेल्या कमतरतेमुळे अधिकारी निवडणूक कामाकडे पाहणार की विभागाचे काम करणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कोणीही बोलण्यास तयार नसल्याचे समोर आले.

हेही वाचा –

प्रचाराचा शेवटचा रविवार; महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभांचा धडाका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -