घरमुंबईड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता

ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता

Subscribe

नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे.

नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ही मान्यता देण्यात आली. बुद्धिस्ट सर्कीट अंतर्गत पर्यटन विभागाने नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी-नागपूर, शांतीवन-चिंचोली आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल-कामठीचा समावेश केला आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा विकास करून जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी विकास कामे करण्यात येणार आहेत. जगातील विविध भागात असलेल्या बुद्ध‍िस्ट टेम्पलच्या प्रतिकृती येथे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडाळाची मान्यता मिळाल्या नंतर अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विकास कामांसाठी निधी मंजूर 

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) पाचवी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षांच्या १५२९ कोटीच्या अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात बांधण्यात आलेल्या घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे आणि घरकुल वाटपासाठी आरक्षण धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नागपूरचे महापौर नंदा जिचकार आणि आमदार मिलिंद माने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -