घरमुंबईकरोनाबाधित तरुणांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब

करोनाबाधित तरुणांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब

Subscribe

शवकक्ष परिचरसह वैद्यकीय अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

सहा दिवसांपूर्वी गोवंडी येथे हत्या झालेल्या मेहराज इजाज अहमद शेख या 23 वर्षीय करोनाबाधित तरुणाचा मृतदेह राजवाडी रुग्णालयात गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी राजावाडी रुग्णालयातील शवकक्ष परिचर आणि वैद्यकीय अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

सिराज अहमद इजाज अहमद शेख हा गोवंडीतील शिवाजीनगर, देवनार परिसरात राहतो. मेहराज हा त्याचा लहान भाऊ असून 3 जूनला त्याची एका टोळीने हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह करोना टेस्टसह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात ठेवण्यात आला होता. 7 जूनला त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रविवारी सायंकाळी चार वाजता त्याचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे कुटुंबिय राजावाडी रुग्णालयात आले होते, मात्र तिथे त्यांना मेहराजचा मृतदेह दिसला नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह गायब झाल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

त्यामुळे सिराज अहमद शेख याने टिळकनगर पोलीस ठाण्यात राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि शवकक्ष परिचर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. मेहराजचा मृतदेह गुरुवारी 4 जूनला रात्री दीड वाजता राजावाडी रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता, 7 जूनला सायंकाळी चार वाजता त्याचा मृतदेह गायब असल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -