घरमुंबईवांद्रे येथे नग्नावस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला

वांद्रे येथे नग्नावस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला

Subscribe

हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय, अज्ञात व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

माहीम कॉजवेजवळील खाडीलगत नग्नावस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे 25 ते 30 असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. या तरुणाची डोक्यात जड वस्तू मारहाण करुन हत्या करुन मारेकर्‍याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍याच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु केल्याचे पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांनी सांगितले.

माहीम कॉजवेजवळील खाडीजवळ एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असून त्याची काहीच हालचाल नाही अशी माहिती एका व्यक्तीने मुख्य नियंत्रण कक्षाला दिली होती. ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अणावकर, पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्यासह इतर पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना एक तरुण पडल्याचे दिसून आले, त्याला तातडीने पोलिसांनी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या तरुणाकडे त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू नव्हती, त्याच्या अंगावरील कपडेही मारेकर्‍याने काढून घेतले होते, जेणेकरुन कपड्यावरुन त्याची ओळख पटू नये. या तरुणाची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह तिथे टाकून मारेकर्‍यांनी पलायन केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

- Advertisement -

अंदाजे 25 ते 30 वयोगटातील हा तरुण असून त्याची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. गेल्या काही दिवसांत या वयोगटातील कोणी तरुण मिसिंग आहे, त्याची पोलिसांत तक्रार आहे का याचा आत पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांनी सांगितले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -