घरफिचर्सये मिलन होगा कैसे ?

ये मिलन होगा कैसे ?

Subscribe

या बँकांतील नऊ युनियनच्या सभासदांनी किमान 10 लाख स्टाफ एक दिवसांचा लाक्षणिक संप पुकारून आपला विलीनीकरणाला तीव्र विरोध असल्याचे दर्शवले. मात्र केंद्रिय मंत्रिमंडळाने आपल्या बैठकीत प्रस्तुत निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि नव्या वर्षाच्या प्रारंभी एका महाकाय बँकेचे ‘नवे खाते’ भारतीय बँकिंगच्या पासबुकात उघडले गेले. अधिकार कम स्वातंत्र्य त्यांना आहे का? एकूणच देशी बँकिंगला आर्थिक विस्कळीतपणापासून सुधारण्यासाठी अजूनही काही बँकांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता आहे. देना-विजया ह्यांचे बडोदा-मिलन -नेमके कसे होणार? संभाव्य परिणाम-पडसाद !!

नवीन वर्षाची पहाट नवीन काही घडवेल, अशी आशा बाळगत आपण सर्वजण 31 डिसेंबरची रात्र सेलिब्रेट करत असतो आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला शुभेच्छांची देवाणघेवाण करत असतो.पुढे वर्षभरात आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्याबाबतीत अनेक भल्या-बुर्‍या गोष्टी घडून येत असतात.असे हे सर्व वर्षानुवर्षे सुरु आहे.2018 साल संपताना बँकिंग इंडस्ट्रीबाबत काही जुन्या आणि हो जुनाटसुद्धा! समस्यांवर काही निश्चित असे तोडगे काढण्याचे ठरवले गेले. आर्थिक तोटा, अनुत्पादित कर्जांचे मोठमोठे डोंगर, भांडवल तुटवडा, सायबर-हल्ले अशा अनेक प्रश्नांनी काही बँक्स अक्षरशः डबघाईला आलेल्या दिसल्या, इतक्या की लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वासच उडावा!! एकाक्षणी सरकारला हे सर्व सावरण्याची वेळ आली आणि त्यातून दिसला नुकसानीत गेलेल्या बँक्सना एकत्रित करण्याचा-विलीनीकरणाचा. म्हणजे नेमके काय होणार?बँकाअंतर्गत काय होईल? आपल्यावर आणि एकूण अर्थव्यवस्थेवर नेमके कसे परिणाम होतील?ते आपण नववर्षाच्या प्रारंभी पाहणार आहोत.

पार्श्वभूमी : देशी बँकिंग – टप्पे –
ब्रिटिश राजवटीत आपल्याकडे बँकिंग होते, तरी त्यावर पगडा-प्रभाव होता तो ब्रिटिश बँकिंग सिस्टीमचा. पुढे 1969 साली काही व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि भारतीय बँकिंगला खर्‍या अर्थाने देशी रूप-स्वरूप प्राप्त झाले. नंतरच्या काळात जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणामुळे आपल्या बँकिंगने कात टाकली. विदेशी बँक्स आणि नव्याने जन्मलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानअधिष्ठित खाजगी बँकांनी पाश्चिमात्य आणि अमेरिकन बँकिंगच्या धर्तीवर नफा कमावण्यासाठी आणि ग्राहक-सेवेसाठी नाविन्यपूर्ण साधने शोधली. झपाट्याने झालेले वाढते उद्योगीकरण, सेवा-क्षेत्राचा डर्शीींळलश खपर्वीीीीूं वाढता विस्तार ह्याकारणाने व्हाईट कॉलर्सच्या नोकर्‍या वाढल्या.गिरणी-धंद्याला घरघर लागली! साहजिकच तरुण कमावता महत्त्वाकांक्षी असा मध्यमवर्ग वाढता राहिला आणि त्यांच्या आधुनिक जीवन-शैलीत फरक पडला. त्यांना लागणार्‍या चैनीच्या वस्तू, उंचावत जाणारे जीवनमान ह्यावर नवीन खाजगी बँक्सनी अधिक लक्ष केंद्रित केले.

- Advertisement -

वाहन-कर्जे, व्यक्तिगत कर्जे आणि गृह-कर्जे अशी नवीन ‘रिटेल लोन्स’अशा बँकांनी बाजारात आणली आणि ग्राहकप्रिय केली. पुढे राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँक्सनाही रिटेल विभागाकडे मोहरा वळवावा लागला. दरम्यान ज्यांना ‘कॉर्पोरेट लोन्स’ म्हणतात, तशा मोठमोठ्या कंपन्यांना/उद्योगपती-उद्योग-समूह ह्यांना प्रचंड प्रमाणात कर्जे दिली गेली. बँकेचे हित आणि नफा ह्यापेक्षा राजकीय हेतू आणि व्यक्तिगत स्वारस्य ह्यांचा अधिक प्रभाव राहिला! परिणामी राष्ट्रीयकृत बँका अनुत्पादित मालमत्तेच्या महाकाय बोझ्याखाली संपून जातील आणि एकूणच भारतीय बँकिंग उद्योग घसरणीला लागेल की काय अशी भययुक्त शंका निर्माण झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि केंद्र सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी स्थिती उद्भवल्याने उपाययोजना आखल्या गेल्या.केंद्र आणि रिझर्व्ह बँक ह्यांच्या मतभेदात गव्हर्नर गमावण्याची नामुष्की झाली. पत आणि प्रतिष्ठा गमावलेल्या बँक्सना आर्थिक संजीवनी देण्यासाठी भांडवल-वृद्धी, जुने कर्ज-डोंगर कमी व्हावेत म्हणून कडक कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी, तोट्यातील बँकांचे विलीनीकरण असे काही ठोस मोजक;े पण परिणामकारक उपाय निश्चित करण्यात आले आणि कार्यवाही सुरु झाली.

बँक विलीनीकरण प्रक्रियेस प्रारंभ -महाकाय डोंगराएवढे एनपीएजचा भार असतानाच उद्योगपती विजय मल्ल्या-नीरव मोदी अशी करोडो रुपयांचा चुराडा करणारी भ्रष्टाचाराची महाकाय प्रकरणे, तोट्यात चालणार्‍या बँकांना अधिक समस्य-ग्रस्त आणि त्रस्त केले, अशा बेजार आणि आजारी असलेल्या देशी बँकिंगला प्रगतीपथावर येण्यासाठी अनेक धोरणात्मक असे ठोस उपाय अंमलात आणणे अगदी युद्धस्तरावर हाती घेतले गेले.त्यात राष्ट्रीयकृत बँकांना भांडवल संजीवनी देणे आणि तोट्यातील बँकांना सामावून घेणे, अनेक बँकांच्या अनुत्पादित मालमत्तेला व नुकसानीतील शाखांना पोसत राहण्यापेक्षा मोजक्या कार्यक्षम बँक असणे हे गरजेचे झालेले आहे. हे ओळखून सर्वात आधी स्टेट बँकमध्ये सर्व समूहातील बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. पाठोपाठ बँक ऑफ बरोडामध्ये, देना बँक आणि विजया बँक ह्यांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव गेल्या नोव्हेंबरातच मंजूर झाला. परंतु काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता होणे बाकी असल्याने ‘मुहूर्त’ पुढे गेला. दरम्यान ‘नीरव मोदी’प्रकरणाने बदनाम झालेल्या पीएनबी बँकेबाबत बातमी आली, परंतु पीएनबी बँकेच्या व्यवस्थापनाने आपण कोणाही बँकेमध्ये विलीन होण्यास राजी नसल्याचे जाहीर केले आहे. असा ये मिलन होगा कैसे ?

- Advertisement -

वैशिष्ट्ये :-
1 दोन बँका सामावून घेतल्याने यापुढे बँक ऑफ बडोदा -ही देशातील तिसर्‍या क्रमांकाची बँक होणार पहिला नंबर- स्टेट बँक, दुसरा -एचडीएफसी
2 प्रत्यक्षात विलीनीकरणासाठी 1 एप्रिल, 2019 चा मुहूर्त
3 देशात मोजक्या बँका असाव्यात आणि ‘सशक्त बलाढ्य बँकिंग धोरणाचा प्रारंभ

धोरणात्मक अपेक्षा –
1 बँक ऑफ बडोदा – जागतिक पातळीवर स्पर्धात्मक प्रगतीसाठी सिद्ध होईल
2 क्रेडीट म्हणजेच कर्ज देण्याची कुवत मोठ्या प्रमाणावर वाढेल
3 देशभरातील विस्तीर्ण नेटवर्किंगचा -शाखांचा सकारात्मक वापर अपेक्षित

रूपरेषा आणि विविध घटकांवर होणारे परिणाम :-
1 कर्मचारी-कपात -तिन्ही बँकांच्या एकूण कर्मचारी संख्याबळात घट होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री रविप्रसाद ह्यांनी दिली आहे. देना आणि विजयाचे सर्व कर्मचारी आपसूकच बँक ऑफ बडोदामध्ये सामावले जातील. असे होत असताना त्यांच्या सद्यस्थितीतील उत्पन्न-सेवा आणि शर्ती ह्यात कोणताही बदल होणार नाही.
ही एक मोठी लक्षणीय बाब आहे. कारण अनेकदा विलीनीकरणाच्यावेळी दुबळ्या बँकेतील कर्मचारी-वर्गावर कुर्‍हाड चालवली जाते आणि याकारणाने कर्मचारी संघटनांचा विरोध असतो.
2 ग्राहक-स्थिती – तीनही बँकातील ग्राहकांना मिळणार्‍या सेवांच्या दर्जात बदल होणार नाही, व्याजदर आणि सोयीसुविधा तशाच मिळू शकतील.
3 शेअर्सचे मुल्यांकन – असे जेव्हा विलीनीकरण होते,तेव्हा विलीन होणार्‍या बँकांच्या शेअर्सचे मूल्य हे ज्यात विलीनीकरण होणार त्याबँकेच्या शेअर्सच्या किमतीच्या तुलनेत पडताळून पाहिले जाते आणि त्यानुसार मुल्यांकन आणि वाटप-प्रमाण ठरवले जाते. यासंदर्भात जाहीर झालेले मुल्यांकन-प्रमाण खालीलप्रमाणे :-

विलीनीकरण ज्यात होणार ती एकत्रित बँक – बँक ऑफ बडोदा
शेअर हस्तांतरण प्रमाण डुरि ठरींळे ठरवताना दोन्ही बँकांच्या 1000 शेअर्सच्या तुलनेत बडोदाच्या शेअर्सशी मुल्यांकन करण्यात येणार आहे

असे शेअर्सचे मुल्यांकन ठरवताना अनेक मुद्दे विचारात घेतले जातात, त्यानुसार नव्याने निर्माण होणार्‍या मोठ्या बँकेचे शेअर्स दिले जातात.
1 देना बँक – प्रति 1000 शेअर्सच्या बदल्यात -बँक ऑफ बडोदाचे 110 शेअर्स मिळू शकतील
उदाहरणार्थ – ज्याच्याकडे देना बँकेचे एक हजार शेअर्स असतील त्यांना विलीनीकरण प्रक्रीयेच्याकारणाने बँक ऑफ बडोदाचे 110 शेअर्स मिळतील.
2 विजया बँक- प्रति-1000 शेअर्सच्या बदल्यात -बँक ऑफ बडोदाचे 402 शेअर्स मिळू शकतील
म्हणजेच तुमच्याकडे विजयाचे जरी एक हजार शेअर्स असतील तरी यापुढे विजया बँकेचे अस्तित्वच राहणार नसल्याने ते शेअर्स निकामी न होता रुपांतरीत होऊन, त्याबदल्यात बँक ऑफ बडोदाचे शेअर्स मिळू शकतील.
काही व्यावहारिक बाबी आणि धोके –
1 कोणतेही ‘विलीनीकरण’ होत असताना कागदोपत्री आराखडा खूप तपशीलवार केला जातो, परंतु वास्तवात आणताना अनेक नवीन समस्या निर्माण होतात ज्या अकल्पित असतात; पण ते आकस्मिकरित्या उत्पन्न होत असतात. म्हणून त्यावर उपाय करणे, पूर्व-तयारी करणे सोप्पे नसते.
2 जिथे मनुष्यबळाचा अंतर्भाव आहे तिथे छोट्या-मोठ्या अडचणी येणारच. त्याकरिता तत्परतेने सोडवणूक करणारे व्यवस्थापन असावे. तंटा टोकाला न जाता मानवी दृष्टीकोनातून सामंजस्याने सोडवला जावा.
3 आधुनिक तंत्रज्ञान कितीही उपकारक असले तरीही छोटी चूक ते घोडचूक होऊ शकतात.म्हणून सावधानता-सतर्कता अपेक्षित आहे. सायबर हल्लेखोर आपले जाळे पसरवतील, तेव्हा अधिक जागरूकता दाखवावी. कोठेही बेफिकिरी, दिरंगाई, गाफीलपणा आणि नियमातून पळवाटा शोधणे करू नये.
4 ग्राहक-समाधान महत्त्वाचे – जिथे सहभागी आहेत, तिथे त्यांना कोणताही त्रास होणार नाही ह्याला प्राधान्य द्यावे.
5 विलीनीकरण प्रक्रिया उेाश्रिशु झीेलशीी तंतोतंत यशस्वी होणे मस्ट आहे. कारण अपयशी ठरल्यास व्यापार-उद्योगाला अडचणीचे तसेच विदेशात चुकीचे संकेत मिळू शकतात.
6 शाखा बंद-स्थलांतरित होणे-लगेच नाही; पण नजीकच्या काळात तुमच्या घर-ऑफिसच्याजवळ असलेली बँक बंद केली जाईल आणि तुमचे खाते परस्पर दुसर्‍या शाखेत हस्तांतरित होईल,म्हणून आपण हबकून जायचे कारण नाही. तुम्हाला अगदीच गैरसोयीचे वाटले तरच खाते बंद करा ! अन्यथा तसेच चालू ठेवा.
7 ग्राहक-जनसंपर्क परिणामकारक हवा – कोणतेही बदल पूर्वसुचनेशिवाय केले जाऊ नयेत, म्हणून बँकांनी आपली संपर्क-यंत्रणा प्रभावी ठेवणे जरुरीचे आहे. अफवा वा गैरसमज होण्यास वाव देऊ नका.
8 कर्मचारी सौजन्य – स्टाफवर दुहेरी जबाबदारी असते -1) नव्या वातावरणात एड्जेस्ट होण्याची 2) ग्राहकांना संपूर्ण सहकार्य देण्याची. म्हणून त्यांनी शांत राहून सेवा दिली पाहिजे. कुठे काही संभ्रम असले तर वरिष्ठांकडून निर्णय घेतले पाहिजेत. प्रत्येक बँकेचे स्वत:चे असे स्वतंत्र कल्चर असते, दुसर्‍या बँकेत सामावले जाताना नवीन कल्चरमध्ये रुळायला वेळ लागणारच, त्यासाठी पॉझिटिव्हपणा असावा.

काही महत्त्वाचे बदल – जे आपण या बँकांचे खातेदार/ग्राहक असू तर लक्षात ठेवणे जरुरीचे आहे
1 नवीन खाते क्रमांक – तीन बँकांची एक बँक होत असल्याने सामायिक संगणक सुविधा करण्यासाठी आणि एकजिनसीपणा असावा म्हणून नवा कोड-नंबर किंवा तत्सम आयडी बदलला जाईल. म्हणून या तीन बँकांच्या ग्राहकांनी येणारे संदेश/सूचना बारकाईने पहाव्यात.
2 खाते/ठेवी- बंद करू नका – आजवर ज्या बँकेत तुमचे पैसे असतील, ते काही काळ किंवा मुदत संपेपर्यंत त्याच अटी-नियम आणि व्याज योजनेत चालू राहील, तेव्हा कोणतीही भीती न बाळगता आपले खाते बंद करू नका किंवा डिपॉझीट काढून घेऊ नका.
3 बँकेमार्फत येणारे मेसेजेस-नोटीसेस – सर्व प्रकारचे संपर्क नीट वाचून त्याप्रमाणे कृती करा.वर्तमानपत्रातील बातम्या-माहिती वाचत चला. कारण आपण बँक ग्राहकांनी सदैव अपडेट राहणे हे आपल्याच भल्यासाठी असते.

अशा प्रकारचे विलीनीकरण यापुढेदेखील होत राहणार आहेत, तेव्हा आपण बँक-ग्राहकांनी हे सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे. कारण तीन बँकांची एक मोठी बँक निर्माण झाल्याचा लाभ होऊ शकतो आणि ही सारी प्रक्रिया गुंतागुंतीची जरी असली तरी त्यातून भारतीय बँकिंग अधिक सक्षम-प्रभावी होणार आहे.

राजीव जोशी

(लेखक बँक आणि अर्थ अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -