घरमुंबईपिग्मीच्या नावाखाली दाम्पत्याकडून 40 लाखांना गंडा

पिग्मीच्या नावाखाली दाम्पत्याकडून 40 लाखांना गंडा

Subscribe

वाशी येथील एका पतसंस्थेच्या नावाखाली बनावट खाती बनवून दैनंदिन रोकड जमा करून नागरिकांना 40 लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार नवी मुंबईमधील दाम्पत्यांनी केल्याचे समोर आले आहे. वाशी येथील ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटीची बनावट खाती बनवून त्यांनी हा प्रकार केला असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. याप्रकरणी संजय संपत ढमाळ व सुप्रिया संजय ढमाळ यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनी तब्बल 15 जणांची फसवणूक केली असल्याची माहिती अद्यापपर्यंत समोर आली आहे.

वाशी येथील ज्ञानदीप को-ऑप.क्रेडिट सोसायटी या पतपेढीत दैनंदिन रक्कम गोळा करण्याचे काम हे दाम्पत्य करत होते. या दाम्पत्याला यापूर्वीच पतपेढीने काम करण्यापासून रोखले होते. मात्र पतपेढीच्या खाते पुस्तकांची प्रत या दाम्पत्याकडे असल्यामुळे आणि अगोदरपासून पतपेढीमध्ये काम करीत असल्यामुळे ग्राहकांचा त्यांनी विश्वास संपादन केला होता. त्यामुळे या खातेपुस्तकांची बनावट कॉपी तयार करून त्यांनी अनेकांकडून रोख रक्कम घेऊन ग्राहकांची फसवणूक केली. या दांपत्याने पंधरा जणांची 35,30,000 रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -