घरमहाराष्ट्रवणवे रोखण्याची उपाययोजना पाहणी

वणवे रोखण्याची उपाययोजना पाहणी

Subscribe

अप्पर सचिवांनी घातले डोंगर पालथे

सगुणा वनसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून वणवे रोखण्याचे काम केले जात असून, याची माहिती घेण्यासाठी राज्याच्या वन विभागाचे अप्पर सचिव मोहन कर्नाट यांनी स्वतः पाहणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणचे डोंगर चढून त्यांनी वणवे रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

कृषी रत्न शेखर भडसावळे यांनी जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी सगुणा वनसंवर्धन तंत्र शोधून काढले आहे. यात जंगलात वणवे लागू नये यासाठी जाळ रेषा तयार केल्या असून, टेकड्यांवर जंगली वनस्पती लावून घेतल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. वन विभागाचे सचिव सतीश खारगे यांनी देखील गेल्या वर्षी पाहणी करून असा प्रयोग सर्व ठिकाणी राबविण्यासाठी वन विभाग पुढे येऊन काम करेल, असा विश्वास दिला होता.

- Advertisement -

त्यानंतर यावर्षी सुरु असलेले काम पाहण्यासाठी कर्नाट यांनी सगुणा वनसंवर्धन तंत्राने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी नेरळ गाठले. त्यांनतर त्यांनी भडसावळे आणि त्यांच्या सहकार्‍यांसोबत दोन डोंगर पालथे घातले. आधी टपालवाडी येथील डोंगरावर चढून साधारण जमिनीपासून एक हजार फुटावर जाऊन जाळ रेषा आणि जंगली झाडांची लागवड यांची पाहणी केली. त्यानंतर माणगाववाडी टेकडीचीही पाहणी केली. त्यावेळी वन विभागाचे अधिकारी नारायण राठोड, सगुणा वनसंवर्धन तंत्राची जबाबदारी पाहणारे अनिल, तसेच वनपाल दत्तात्रेय निरगुडा आणि वन कर्मचारी सहभागी झाले होते.

हे तंत्र वणवे रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे राज्य सरकारला आपण या तंत्राबाबत सूचित करणार आहोत. वणवे ही आपलीच नाही तर जगाची समस्या बनली आहे. त्यामुळे वणवे रोखण्याची मात्रा आपण जगाला देऊ शकलो तर त्याचा महाराष्ट्राला अभिमानच असेल.
-मोहन कर्नाट, अप्पर सचिव, वन विभाग

- Advertisement -

जगात वणवे कसे रोखायचे यावर संशोधन होत आहे. आम्ही अल्प खर्चात ही यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला आहे.
-शेखर भडसावळे, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -