घरमुंबईठाण्यात पालकमंत्री महायुतीचाच - खासदार कपिल पाटील

ठाण्यात पालकमंत्री महायुतीचाच – खासदार कपिल पाटील

Subscribe

सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात काय फॉर्म्युला ठरतो? यावर सगळं अवलंबून आहे, असेही खासदार पाटील यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपचा पालकमंत्री होईल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासंदर्भात भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री शिवसेनेचा काय, की भाजपचा.. तो महायुतीचाच होईल. पालकमंत्री ठरविण्याचा अधिकार हा वरिष्ठ पातळीवर आहे. अजून सरकार स्थापन झालेलं नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात काय फॉर्म्युला ठरतो? यावर सगळं अवलंबून आहे, असेही खासदार पाटील यांनी सांगितलं.

मतदान कमी झाल्याने मतांची संख्या घटली

खासदार पाटील यांच्यावतीने दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यंदा सोमवार २८ ऑक्टोबर रोजी कल्याण पश्चिम येथील खडकपाडा येथे साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करण्यात आलं आहे. त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी खासदार पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी पालकमंत्रीपदावरून प्रसिद्धीमाध्यमांनी खासदारांना छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ जागांपैकी ८ जागांवर भाजपने तर एका जागेवर भाजप बंडखोर अशा एकूण ९ जागा भाजपने पटकावल्या आहेत. तर ५ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री होईल, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या मतांची संख्या घटल्याबाबत विचारले असता त्यांनी लोकसभेचे मतदान हे देशाकडे पाहून तर विधानसभेचे मतदान हे राज्यातील प्रश्नावर स्थानिक आमदारांवर होत असते. यंदा मतदान कमी झाल्याने मतांची संख्या घटली आहे. त्यामुळेच तो फरक दिसून येत असल्याचे खासदारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -